*औरंगाबाद शहरातील सोनार समाजातील दिग्गज जेष्ठ समाजसेवकांचा*
*लाड सोनार युवा मंच* , औरंगाबाद* यांच्या वतीने सोनार समाजसेवकांनी केलेल्या निस्वार्थ समाज कार्याला
क्रमशः लेखातुन गौरविण्यात येत आहे .
आज श्री चंद्रकांत सिताराम जोजारे यांना या लेखाद्वारे गौरवित आहोत चंद्रकांत रावांचा जन्म औरंगाबाद जवळच्या पाल येथे ६ जानेवारी १९५९ रोजी झाला त्यांना सखारामजी,तुकारा मजी व नामदेवजी असे ३काका होते. १९६४साली वडिलांना नगरपरीषदेत नौकरी लागल्यामुळे सर्व कुटुंब औरंगाबाद येथे स्थलांतर झाले चंद्रकांतराव यांनी १ली ते४ थी १नंबर शाळा, मोतिकारंजा. ५वी ते ७वी मराठा हायस्कुल व पुढे शिवाजी हायस्कुल ,महाविद्यालयिन शिक्षण SB लेजमधे केले .
त्यांना विद्यार्थी दशे पासुनच समाजकार्याची आवड होती १९९३ मधे सुवर्णकार गणेश मंडळाचे अध्यक्ष , समाजाच्या सामुहिकविवाहसोह ळा कार्यक्रमांत २०००मधे उपाध्यक्ष , २००३ मधे सह कोषाध्यक्ष ,२००८ मधे सहसचीव.२०१८..सच ीव.. अशी पदे भुषविली. समाजकार्याची प्रेरणा त्यांना मामा कै,सांडुशेठ हसनाबादकरांकडुन व राजकारणात माजी खासदार कै. साहेबराव पाटिल डोणगावकर यांच्या कडून प्रेरणा मिळाली .चंद्रकांत राव यांनी अनेक लग्ने जुळविली .
समाजकार्यात धर्मपत्नी सौ रंजना ताई यांचे मोलाचे सहकार्य आसते. उभयतांनी मुलांना संस्कार व उच्च शिक्षण दिले. मुलीचा BAनंतर विवाह झाला.मुलगा निलेश MBA नंतर मार्केटिंग क्षेत्रात ऐशियन पेंट कपनीत नुकताच प्रमोशनवर नागपुर येथे रुजु झाला१९८०मधे ग्रेस आय पक्षात प्रवेश केला. ८४मधे संजय गांधी विचारमंच चे ते शहर आध्यक्ष होते.१९९१मधे ते मनपात शासकीय सेवेत रुजु झाले.
निवृत्तीनंतर त्यांना पुन्हा ग्रेस पक्षाचे औरंगाबाद शहर सरचीटनिस( गुलमंडी क)या पदावर नियुक्त केले गेले . मित्र बनविणे व त्यांचे मित्रत्व अजीवन संभाळणे हा त्यांचा छंद . मित्रांच्या सुख दुःखा सहभागी होण्याची चंद्रकांत राव यांना खुपखुप आवड. आनेक नेत्यां सोबतहि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध .. त्यांचा एक छंद मला खुपखुप आवडला ते त्यांच्या जमाण्यातिल हिरो हिरोईनला पत्रे पाठवित..अनेक सिलेब्रिटिंनी दीलेली प्रतिउत्तरे मला पहायला मिळाली त्यातील काहि फोटो सोबत
🌹.आश्या या स्वभावाने शांत ,व मनमिळाऊ समाजसेवकाला *लाड सोनार युवा मंच सलाम* करतो.. !. क्रमशः ५ संकलन नंदुचिंतामणी ,

महा संघटक, लाड सोनार युवा मंच , औरंगाबाद ...!
Ådhåpurë Nånå
माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे समंध आहेत .खूप छान माहिती दिली .चिंतामणी साहेब आपण छान माहिती दिली .आपले आभार
Comments
Post a Comment