समस्त सुवर्णकार बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांसाठी "विशेष प्राविण्य सत्कार २०१८" चे आयोजन.
विद्यार्थ्यांसाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधव व भगिनींसाठी अत्यंत महत्वाची बातमी










महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा जळगाव आणि ऋणानुबंध वधु वर परिचय मेळावा समिती यांच्या वतीनं.........
👉

जळगाव शहरातील सुवर्णकार समाजातील मार्च २०१८ च्या परीक्षेत इयत्ता ५ वी ते उच्च पदवी पर्यंत शेकडा ६० टक्केच्या वर व इतर शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थीनींचा सत्कार.
तसेच........
👉

जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व त्या अनुषंगाने योगदान देत असलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींचा सत्कार देखील करण्याचे योजिले आहे.
तरी जळगाव शहरातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपले गुणपत्रक झेरॉक्स व त्यावर मागील बाजूस पालकांचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकावा.
तसेच जळगाव जिल्ह्यातील अन्य बंधू- भगिनींनी त्यांचा थोडक्यात परिचय, आजवर अनेक क्षेत्रात मिळालेले सत्कार, पुरस्कार याविषयी लिहून अथवा टाईप करून पाठवावा.










गुणपत्रिका व परिचय पत्रक संकलन केंद्र खालील प्रमाणे आहेत.
१. माऊली ज्वेलर्स, सराफ बाजार, जळगाव

२. ज्ञानदीप बुक डेपो, मेहरूण, जळगाव

३.आदित्य संगणक प्रशिक्षण केंद्र, योगेश्वर नगर, जळगाव.

४. किमया ज्वेलर्स, रामानंद नगर, जळगाव.

५. दापोरेकर ज्वेलर्स सुभाष चौक
जळगाव

गुणपत्रक, परिचय पत्रक पाठविण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०१८ ही असून लवकरात लवकर आपली गुणपत्रक व परिचय पत्रक वरील केंद्रांमध्ये जमा करावी.










अधिक माहिती हवी असल्यास कृपया ९९२३३६३९१० या मोबाईल क्रमांकावर प्रसिध्दी प्रमुख श्री. प्रशांत विसपुते, जळगाव यांच्याशी संपर्क करावा.










कार्यक्रमाचे ठिकाण, दिनांक, वेळ इत्यादी बाबी लवकरच जाहीर करण्यात येतील.










आयोजक- महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव, जिल्हा जळगाव व ऋणानुबंध वधुवर परिचय मेळावा समिती.
जय नरहरी
🙏

Comments
Post a Comment