एकाग्रता कशी ठेवावी

एकाग्रता कशी ठेवावी ..*
-------------------------------------
खालील १० सवयी तुम्हाला असे विचलन ताब्यात ठेवून, त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून आणि चालढकलीची संभाव्यता टाळून तुमच्या कामात एकाग्र राहण्यास मदत करतील:
*स्वतःवर लक्ष ठेवा :* विचलन हे आंतरिक किंवा बाह्य अशा दोन्ही स्वरूपांतील असू शकतात, त्यामुळे प्रथम स्वतःमध्ये डोकावून पहा. जर तुमचे लक्ष सगळीकडे जात असेल, तर मग स्वतःच्या मनात डोकावून नक्की तपासा की, नक्की गडबड काय आहे? तुमच्या चंचलपणा आणि अस्वस्थतेमागील कारण काय आहे?
*तुमच्या आयुष्यात क्रियाशील राहण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? कारणे ओळखा :* एकदा का तुमच्या प्राथमिकता ठरल्या की, इतर बाह्य कारणे ओळखा. त्यामधील एक तुमच्या कार्यालयातील वातावरण हे आहे का? अनाहूत सहकारी? तुम्ही करत असलेल्या कामासाठी लागणारा वेळ, कल्पनाशक्ती किंवा कौशल्य यांची कमतरता? एकदा का तुम्हाला कारणे ओळखता आली, की मग त्यांच्या परिणामांवर उपाय शोधता येतील.
*पूर्वतयारी करा :* सर्व यशस्वी नेते हे उत्तम नियोजक आहेत; ते प्रत्येक बारीक-मोठ्या ध्येयाच्या याद्या तयार करतात. जेव्हा एखादे काम तुमच्याकडे येते, तेव्हा ते कसे पूर्ण करायचे यावर वेळ देऊन थोडा विचार करा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व पायर्‍या अंदाजे वेळेसहित लिहून काढा. असे म्हणतात की, नियोजनात घालवलेली 10 मिनिटे अंमलबजावणीतील एक तास वाचवतो.
*ऑफलाइन राहायला शिका :* ई-मेल, सोशल मीडिया आणि भ्रमणध्वनी ही विचलित करणार्‍या सर्वात मोठ्या कारणांपैकी काही आहेत. तुम्हाला जर का खरेच जास्तीत जास्त एकाग्र व्हायचे असेल, तर तुम्हाला जे करायचे असेल ते पूर्ण होईपर्यंत स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवा.
*स्वतःला वेळ द्या :* मोठी कामं करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी एक म्हणजे कामातून विराम घेण्याची वेळ माहीत असणे, ही होय. जेव्हा तुम्हाला विचलित झाल्यासारखे वाटते, तेव्हा कामातून विराम घ्या आणि मग पुनर्मूल्यांकन करा व पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे मन अधिक मोकळे होऊन ते पुन्हा ताजेतवाने होते.
*गाणी ऐका :* गाणी ऐकणे हे कोणतीही गोष्ट जुळवून आणू शकणार्‍या उत्तमोत्तम गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमच्या भोवतालची प्रत्येक गोष्ट ही लक्ष विचलित करणारी असेल, तेव्हा तुम्हाला ध्यान आकर्षित करणार नाहीत, पण तुमच्या एकाग्रतेसाठी पार्श्वसंगीत म्हणून काम करतील असे संगीत तुमच्या हेडफोन्सवरून ऐका. संगीत तुम्हाला लक्ष एकाग्र करण्यास मदत करतील आणि हेडफोन्समुळे इतरांना तुम्ही व्यस्त आहात, असा इशारा मिळेल.
*कामाचे तुकडे करा :* विशेषतः जेव्हा विचलनं खूप जास्त असतील, तेव्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या मोठमोठ्या कामांची लहान तुकड्यांमध्ये विभागणी करणे साहाय्यक ठरेल आणि तुमच्या मनातही कामाच्या पूर्तीची आणि काम पुढे सरकत असल्याची भावना निर्माण होईल.
*स्वच्छता बाळगा :* तुमच्या कार्यालयाची अवस्था कशी आहे? जर ते अस्वच्छ, अस्ताव्यस्त व अव्यवस्थित असेल, तर काही वेळ देऊन ते स्वच्छ करा, जेणेकरून तुम्ही अधिक एकाग्रतेने काम करू शकाल.
*प्रत्येक कामाची मुदत ठरवा :* जर तुम्ही किचकट गोष्टीवर काम करत असाल, सरासरी 90 मिनिटे ही त्यातून काहीही फायदेशीर मिळवायला लागतात आणि सुमारे 30 मिनिटे फक्त तुमचे मन त्यावर लावायला लागतात. एकदा का तुम्ही कामाच्या प्रवाहात आलात की, कामाची वेळ निश्चित करा आणि जेव्हा वेळ संपेल, तेव्हा थांबा. जेव्हा शेवट दृष्टिक्षेपात असेल, तेव्हा एकाग्रता जोपासणे सोपे असते.
*लवकर उठा :* ही खूप सोपी गोष्ट आहे, पण ही सवय अंगीकारल्यास याचे परिणाम खूप खोल आणि चांगले आहेत. आपला कामाचा दिवस इतरांपेक्षा एक तास अगोदर सुरू करा. तो एक तास तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी आणि इतर काही विचलन येण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यासाठी खर्च करा. तसेच कार्यालयातील लांबलचक जेवणाची वेळ वगळा आणि त्याऐवजी छोटासा ब्रेक घेऊन पाय मोकळे करून या किंवा काही तरी हलके आणि पोषक खाऊन घ्या आणि डोक्यातील विचार साफ करा. यामुळे तुम्ही स्वतःला खर्‍या अर्थाने वेळ आणि ऊर्जा देत असाल. तुमच्या भोवतालची विचलनं कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे आपणच स्वतः त्यांच्यावर मात करायला शिकणे हेच उत्तम आहे.
– टीम स्मार्ट उद्योजक
=======================
*ज्ञानामृत मंच समुह*

Comments