

सर्व लग्न झालेल्या मुलानी हा मेसेज वाचावा
* लग्न झालेल्या मुलाच्या आई वडीलांसाठी पारीवारीक प्रश्न हाताळणार्या एका नामांकित "सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने" सासू सुनांमधे भांडणे होवू नयेत म्हणून अनुभवाचे दहा मुद्दे आपल्या पुढे सुचविले आहेत त्याचा शक्यतो अवलंब करावा असा सल्लाही दिला आहे..!*
*१-आपल्या मुलाला व सुनेला लग्नानंतर त्यांनी सोबतच रहावं याचा हट्ट करू नये.त्यांना लग्नानंतर काही दिवसांनी स्वत:हून वेगळं रहाण्याची परवानगी द्यावी.मग ते भाड्याने घर घेवू देत अथवा विकत घर घेवून राहिले तरी अतिऊत्तम.कारण नाती संपूष्टात आल्यापेक्षा नात्यांमधे अंतर परवडलं व महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्नानंतर आपल्या मुलाचे कोणतेही प्रश्न आपले नसतात.*
*२-सुनेला अतिरेकाने मुलगी मानायला जाऊन तीच्यावर विनाकारण मुलगी समजून अधिकार गाजवायला जावू नका,कारण तीची सख्खी आईच तीच्या आईच्या जागी असते.ती जागा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका.ती तुमच्या मुलाची पत्नी असुन तीच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालू नका.*
*३-तुमच्या सुनेला कोणत्याही सवयी असू द्या,त्यावर तूम्ही कोणतीही प्रतिक्रिया देवु नका.कारण तो तीचा व तुमच्या मुलाचा प्राॅब्लेम आहे.तुमचा नाही.*
*४-जरी तुम्ही एकत्र रहात असलात अथवा व्यवहार एकत्र असले तरी त्यांचे कपडे,भांडी धुणे..त्यांचा स्वयंपाक,त्यांच ी मुले जोपर्यंत ते दोघं स्वत:हून विनती करत नाहीत आणी तुम्हालाही ते झेपत नसेल तर मग बिलकूलच सांभाळू नका.सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलाचे प्राॅब्लेम हे तुमचे नाहीत.त्यांचे प्रश्न त्यांनाच सोडवू द्या.*
*५-मुलाच्या आणी सुनेच्या भांडणात अजिबात मध्यस्थी करू नका.आपण आंधळे,बहिरे व मुके आहोत असेच दाखवा.*
*६-तुमचे नातवंड ही त्यांची मुले आहेत त्यामुळे त्यांच्या संगोपना व भविष्याबाबत त्यांनाच निर्णय घेवू द्या.तुमचा मुलगा व सून मोठे झालेले आहेत त्यांना त्यांच बरं वाईट कळायला लागलेलं असतं म्हणून मागीतल्याशिवाय सल्ले व मदत करू नका.*
*७-तुमच्या सुनेकडून तुमच्या देखभालीची अथवा आदराची अपेक्षा करू नका,तो संस्काराचा भाग असतो.पण तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार व शिक्षण द्या.तुमचे संगोपन,सुरक्षित ता आदर करणे तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे.तुमचा मुलगा जसं सांगेल तसच तुमची सून वागेल,कदाचित ती तुमच्या मुलाचं ऐकणारही नाही.इथे दोन्ही घराण्यातील शिकवण व संस्काराचा विषय महत्वाचा असतो.*
*८-आपल्या भविष्याचे व्यवस्थित नियोजन करा.मुलांवर अवलंबून राहू नका.मुलांचे संगोपन,संस्कार, क्षण,लग्नापर्यं तच तुमची कर्तव्य आहेत.जीवनाचा मोठ्ठा हिस्सा तुम्ही त्यांच्यासाठी खर्च केला आहे आता तुमच्या जवळील जी काही पूंजी आहे ती व्यवस्थित गूंतवणूक करून ठेवा.दरमहा खर्चाला पैसे कसे येतील व अचानक उदभवणार्या दवाखाना,औषधे इ.ची मेडीक्लेम काढून तजविज करून ठेवा.भावनेच्या भरात जवळील पैसे वाटू नका.याबाबतीत मुले तुम्हाला भावनाविवश करतील,जबरदस्ती करतील,नातवंडांच ा हवाला देतील पण तुम्ही ठाम रहा.जीवात जीव आहेतोवर पैसे,मिळकत कुणालाही देवू नका.गूपचूप मृत्यूपत्र करून ठेवा.कारण या मतलबी युगात कूणी कूणाचं नसतं हे लक्षात ठेवा.*
*९- निवृत्ती नंतर मनं रमवण्यासाठी योजना आखून ठेवा.सार्वजनिक क्षेत्रात स्वत:ला गूंतवून ठेवा.शेजारपाजार सांभाळा,वेळप्रस ंगी तेच कामास येतील.*
*१०-नातवंडे ही तुमच्या जास्त जवळची असतात.त्यांना चांगले संस्कार,प्रेम,म ाया द्या पण तरीही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.थोढक्यात काय तर आपली काळजी आपणच घ्यायची आहे हे लक्षात असू द्या..!*
*वरील मुद्दे हे कोर्टात घडणार्या प्रसंगाधारीत व अनूभवाधारीत असल्याने परंतू वस्तूस्थितीला धरून असल्याने आपली संस्कृती,परंपरा जरी नातेसंबंध सांभाळणारी असली तरी त्यात वितूष्ट येवू नये म्हणून विचारात घेण्यासाठी व "PREVENTION IS BETTER THAN CURE"यासाठी बहूतांशी योग्य आहेत म्हणून पाळावे असा सल्ला देत आहे.मुद्दे जरी वादग्रस्त असले तरी पटल्यास शेअर करायला हरकत नाही..!*









Comments
Post a Comment