विश्वकर्मा महाराज इतिहास
श्री विश्वकर्मा पंचपुत्र –पंच ब्राम्हणहर्षी
भ्यः पंचशिर्षो मनुः प्रथमः।
मयो व्दितीयः। त्वष्टा तृतीयः। शिल्पी चतुर्थः।
पंचम विश्र्वज्ञः।
मनु ,मय ,त्वष्टा , शिल्प्पी ,विश्वज्ञ या पांच पुत्रानाच अनुक्रमे सानगऋषि, अहाभूनऋषि,प्रत्नऋषि आणि सुवर्णऋषि असेही म्हणतात.
उध्वर्वमुखापासुन झालेला पाचवापुत्र सुवर्णऋषि हा सुवर्णरत्नसंबधी अलंकारादी शिल्पक्रियेचा अधिपती (सोनार) आह़े. वेदकाळात हेच ब्रम्ही देवासाठी, किरीट, मुकुट, कुडलदी नानविध सुवर्ण व रत्नजडित अदभुत शिल्पकलेचा आविष्कार तयार करीत. सुवर्णरथ, देवमूर्ती इत्यादीसाठी सुवर्णकार आजही हेच काम करीत आहेत.
याच विश्वकर्मा मुखोदगतपंच ब्रम्हमहर्षिनी पाच वेदांची निर्मिती केली. कपिलगीताध्याय- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद, सुक्षवेद यातील पाच सुक्ष्मवेद आता अस्तित्वात नाही.
प्राचीन काळी (वेदकाळात) जाती नव्हत्या. पौरुषेय व आर्षेय ब्राम्हणात रोटी व बेटी व्यवहार होत होता. परंतू अगस्ती ऋषींच्या शाप प्रकरणापासून रोटी बेटी व्यवहार करण्याचे सोडले. त्याकाळात पंचशिल्पांपैकी कोणीही कोणतेही शिल्पकर्म करत असत. नंतरच्या काळात पंचशिल्पापैकी एकच शिल्पकर्म करत राहिल्यामुळे व्यवसायाच्या निमित्ताने पंचशिल्पकारांचे वेगवेगळे गट तयार होत गेले.वास्तविक हे विश्वकर्मा वंशज आप्तस्वकिय आहेत. पण व्यवसायावरुन व परिस्थितीनुरुप त्यांच्याही शाखा, पोट शाखा आस्तित्वात आल्या.पुढे त्याचे जातीत रुपांतर झाले. विश्वकर्मा वंशजांना इतिहासात आर्य अशी संज्ञा असून त्याचे मूळस्थान हिमालयाच्या दक्षिणेकडील प्रदेशात असावे. लोकसंख्या वाढत गेली तेव्हा हे वंशज सिंधू, गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा नदयांच्या प्रदेशात येऊन राहिले.त्यानंतर ते पंजाबात तेथुन दक्षिणेत गेले. काहींनी सिलोन, ब्रम्हदेश,जावा मध्ये वस्ती केली. अशा त-हेने सर्व भारतात ते विखुरले जावुन सबंध विच्छेद झालेत. सुमारे 2500 वर्षापासून दक्षिणभारतात विश्वब्राम्हण शिल्पकारांनी वस्ती करण्यास सुरुवात केली.
भारतात सुमारे 3000 संख्येच्या वर जाती असण्यात विश्वकर्मीय पंचाल ब्राम्हण, स्वकिय, एक वंधीय असुनही त्यांच्या लोहार, सुतार, तांबट, पाथरवट, सोनार हया जाती व यामध्येही अनेक पोटजाती देशपरत्वे निर्माण झाल्या.
Comments
Post a Comment