विवाह विधी आणि काही महत्वाच्या बाबी
धर्म,प्रजा,संपत्ती प्राप्त करण्यासाठी विवाह संस्कार केला जातो.देवणी पित्तर यांच्या ऋणातून मुक्त होणे हा विवाह संस्कार करण्याचा उद्देश आहे.आपल्या समाजात प्रचलित असलेला व प्रम्प्रगात चालत आलेला विवाह विधी ब्राम्हविवाह विधीचा मूलाधार आहे.ब्राम्हविवाह म्हणजे वराला विधी पूर्वक सालंकृत कन्या उदक धारेषा दान करणे होय.हा सर्व विधी अग्नी,ब्राम्हण व अथीथी यांचे समोर केला जातो.त्यामुळे वाढू वर यांचेवर सामाजिक व धार्मिक वैवाहिक बंधन आपोआप येते.
विवाह संस्काराचे महत्त्व: विवाह हा एक म्पावित्र संस्कार आहे.हिंदुध्र्माने या संस्काराला अतिशय उदात्त आणि मंगल स्वरूप दिलेले आहे.अन्य धर्माचे विवाह हा एक करार समजला जातो.त्यमुळे संसारात बिनसले कि घटस्फोट होऊन वेगळे व्हायचे पुन्हा दुसरा विवाह!एवढे करूनही संसारात सुख प्राप्त नाही.संसारात अडचणीवर मातकरून परस्परांना आपण आयुष्यभर समजावून घ्यायला हवे.हि पवित्र भावना तिथे नाही सुरक्षितता स्थेर्य प्राप्त होण्यासाठी तसेच वैवाहिक सुखी जीवनासाठी सुज्ञानी काही रीतीरिवाज,यम,नियमांचा,धर्मिकाचारणात समावेश केला.असा रीतीने धार्मिक प्रम्प्रगात पद्धतीने म्हणजेच ब्राम्हविवाह पद्धतीने विवाह करणे हे अत्यंत श्रेष्ठ आहे याची समाजाला जाणीव करून दिली.विवाहित स्त्री-पुरुषांच्या संततीला समाजात मनाची जागा मिळते.त्यमुळे कुळाचे पावित्र्य राहते.समाजजीवन निकोप राहते.म्हणजे विवाह संस्था हि कुटुंबापुरती मर्यादित न राहता समाजजीवनाचे पावित्र्याशी तिचा संबंध येतो.
अशा ब्राम्हविवाह पद्धतीने पूर्वापार पद्धतीने व सामाजिक रीतीरिवाजानुसार विवाह संस्कारात कोणकोणते अंगभूत विधी असतात.त्यांची माहिती करून घेऊ यामुळे आपण करीत असलेले विधी कोणते?त्याचे महत्व काय?बदलत्या काळानुरूपत्यात काय सुधारणा हवी.शहरात जग अभावी-वेळे अभावी तसेच भरमसाठ होणारा खर्च टाळण्यासाठी आपण पर्याय शोधात असतो कधी कधी अचानक उद्भवणाऱ्या दुखद घटनामुळे ठरलेल्या दिवशी विवाह करावा कि नाही?अशा अनेक समस्या आपणा समोर उभ्या राहतात.त्या दृष्टीने धर्म शास्त्रीय निर्माण काय आहेत त्याची माहिती असणेही महत्वाचे असते.
लग्न समारंभात श्रीमंतीचा तहात दाखीव्ने.प्रत्येकाच्या एपतीवर अवलंबून राहील.परंतु धार्मिक विधिना फार महत्व असते हे विसरून चालणार नाही जेवनावळीचा थाट,रुखवताचा थाट मंडप सजावट,निमंत्रक पत्रिका,वर घोडा व्रत अशा अनेक गोष्टीसाठी वारेमाप खर्च केला जातो.या गोष्टी अत्यंत साधेपणाने केल्या तरी चालतात.येथे प्रत्येकाने अन्त्रून पाहून पाय पसरावे.परंतु कोणत्याही परीस्थित ऋण काढून सन साजरा करू नये.
विवाह संस्कार हा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक महत्वही त्यास आहे.दोन कुटुंबात अतूट नाते व आत्मीयता निर्माण करण्याचा महत्वाचा हेतू त्यात आहे.वाढू-वर पक्षांनी एकमेकाला समजून घेऊन सहकार्य करावे.समाजातील सर्व साधारण समाजाला आदर्श होईल अशी विवाह पद्धती अमलात आणावी.
पत्रिका मेलन: उपवर मुला मुलींचे तीपण म्हणजे जन्म लग्न कुंडली पाहणे.वाढू वरांच्या जन्म नक्षत्रावरून एकूण जे छतीस गुण येतात.त्यापैकी कमीत कमी अठरा गुण जमावे असे फलज्योतिष शास्त्रातील वाढू-वरांचे गुण मेलन पद्धती नुसार सांगितले आहे.'गुणमेलन"हि विवाहाला पूर्व समंती दर्शवते .विवाहोत्तर भावी काळातील होणार्या संसारिक घटनांची कल्पना गुणमेलन पद्धतीत नसते.त्यासाठी फालादेशाव्रून वाढू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा (life reading ) आढावा घ्यावा लागेल.
१८ पेक्षा अधिक गुण आले असले तरी विवाह 'त्याज्य 'म्हणून सांगितले आहे.त्याचे कारण एक्नदी दोष,मंगळदोष, गणदोष,कुट्दोष,जन्मनक्षत्र,दोष असे असते.
विवाहोत्सुक उभयतांना आपल्या वैवाहिक जीवनातील अत्यंत महत्वाच्या शुभाशुभ घटना समजून घ्यावयाची ईच्छा झाली तर केवळ रक्त गट तपासणी,परस्पर परिचय पद्धती करून भागात नाही.त्यासाठी त्रिकाळज्ञानी शास्त्रकारांनी सुखोल मार्ग्र्दर्शन करणारी फलज्योतिष पद्धतीचा अंगीकार करावा किंवा स्वताला बुद्धिवादी म्हणून जीवनाचा खेळ करून घाय्वा हे प्रत्येकाने ठरवावे.
पत्रिका मेलन झाले कि पसंतीचा कार्यक्रम होतो.पसंती दोघाकडून असते केवळ मुलाने मुलगी पसंत केली कि झाले असे होत नाही.मुलीलाही मुलगा पसंत पडावयास हवा.शिवाय मुलगी नेहमी मुलापेक्षा वयाने लहान असावी.मुला मुलीची आंगलाट मिळती-जुळती असावी.तसेच उभयतांचे कुल-शील-शिक्षण कर्तुत्व रंगरूप हे देखील विचारात घ्यायला हवे.मुलगी अनुरूप असूनही गरिबीमुळे लागणे होऊ शकत नाही अशा अनेक घटना समाजात घडलेल्या दिसून येतात.मुलांच्या राहत्या जागेबद्दल अधिक सखोल माहिती घ्यावी.कारण लग्न झाल्याबरोबर आता तुम्ही वेगळा संसार थाटा!म्हणून सांगितले जाते.किंवा स्वतंत्र घर घेण्यासाठी आर्थिक मागणी मुलीकडे केली जाते.काहीवेळा मुलीचे अथवा मुलाचे जन्म तीपण नसते.मग दोघांच्या चालू नावावर जमिवले जाते,त्या वेलास एकाची जन्मपत्रिका व एकाचे चालू नावावरून जमवू नये.
मुलीच्या घरी मुलगी पाहण्यासाठी अनेक पाहुणे मंडळी येतात .चहापान होते व नंतर मुलगी पसंत नसल्याचे कळवले जाते.अशा वेळेस प्रथमच मिळणाऱ्या नकारामुळे मुलीच्या मानसिक अवस्थेची कल्पना केवळ तीच करून शकेल.मध्यस्थाने मुलामुलींच्या पाहण्याचा प्रसंग चतुराईने एखाद्या शुभ प्रसंगात घडवून आणावा.पसंतीचे होकार मिल्यावर मग चहापानाला मंडळी घेऊन जाने उत्तम-पत्रिका मेलन-पसंती होत असली तरी विवाह कार्य खर्चासंबंधी ,देण्याघेण्यासंबंधी चर्चा व्हावी.व या विषयी उभयपक्षी मतैक्य होत असेल तर पुढे पूल टाकावे.
कुंकू लावणे: वर सांगितल्याप्रमाणे पत्रिका मेलन व वधू वर पसंती झाल्यावर वर पक्षाकडील मंडळी वधूच्या घरी येतात.सुवासिन भावी वधूला हळद कुंकू लावते.वेणी देतात.पेढ्याचा पुढा वधूच्या हाती देऊन पसंतीचा नाक्कीपणा सांगितला जातो.
बैठक: (यालाच याद्या करणे असेही म्हणतात).वाढू-वर पक्षाकडील जबाबदार मंडळी,मध्यस्ती,समाजातील प्रथीष्ठीत समाजबांधव यांची बैठक घेतली जाते.बैठकीत विवाहकार्य खर्च ,देणे घेणे,यासंबधी चर्चा होते,बैठक घेण्यापूर्वी वधू -वर याज्मानामध्ये या विषयासंबधी फलद्रूप बोलणी झाली असल्यास बैठकीत मानसिक ओढाताण न होता बैय्हक शांततेने व उत्तमरीत्या पार पडते.नाहीतर उगाचच खोळंबा तर होतोच व एकमेकाविषयी गैरसमज होण्याचा प्रसंग उदभवतो.
विषय: (१)लग्नकार्यासाठी मंगलकार्यालय घेणे,बाहेरगावाहून वऱ्हाड येणार असेल तर विवाह पूर्व दिवशी रात्रौ मंगलकार्यालय ताब्यात घ्यावे लागते. आलेल्या मंडळाची राहणे ऐखाणे ऐपिणे, याचीही सोय करावी लागते. सकाळचा चहाऐनाश्ता, दुपारचे भोजनऐसायंकाळी स्वागत समारंभ असल्यास त्यावेळी होणारा आयक्रिम किंवा पेय, हॉलचे भाडे, भटजी व विधीसाठी लागणारे साहित्य, यासाठी होणारा खर्च उभयपक्षांनी अर्धाऐअर्धा सामाईक करणे. काही वेळेस एकपक्ष अर्धा खर्च देण्याऐवजी रोख रक्कम दुसऐया पक्षास देण्याचे कबूल करतो व लग्नकार्य तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही करा म्हणून सांगतो.
मुलाचा पोषाख, अंगठी, देणेऐघेणे, उभयपक्षाकडून देण्यात येणारा अहेर. नथ (मुलीचे नाक, सासरच्या हातात द्यायचे नाही म्हणून माहेरची काही ठिकाणी मुलाकडून नथ असते.) हा प्रश्नही बैठकीत सोडवून घ्यावा. साखरपुडा विवाहाची तारीख ठरवावी विवाहाची तारीख ठरवितांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
गुरू शुक्राच्या अस्तामध्ये कोणतेही मंगलकार्य करू नये.
विवाह प्रसंगी वधूला गुरूबळ व वराला रविबळ असावे. विवाहसमयी वधूच्या जन्मराशी पासून गुरू 2, 5, 7, 9, 11 या स्थानी असणे उत्तम 1, 3, 6 वा 10 स्थानी गुरू असल्यास मध्यम व 4, 8, 12 या स्थानी गुरू असल्यास अनिष्ट समजतात.
वराच्या विवाह प्रसंगी त्याच्या जन्मलग्न कुंडळीत रवि हा ग्रह त्याच्या जन्मराशी पासून 3, 6, 10, 11 या स्थानी असल्यास उत्तम (शुभ) व 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 12 यापैकी एखाद्या स्थानात असेल तर तो अशुभ समजावा.
वधूची तसेच घरच्या यजमानीन यांची मासिक पाळीची अडचण विचारात घ्यावी. अशा रितीने विवाहसंबंधी बोलणी पूर्ण झाली की बैठकीतील उपस्थितांसमोर यजमानांनी परंपरेनुसार डोक्यात टोपी घालून नारळ पानाचा विडा देऊन एकमेकांना भेटावे व बैठकीत एकमेकांच्या सामंज्यस्याने विवाहकार्यासंबंधी झालेल्या ठरावाविषयी उपस्थितांचे आभार मानावे व मंगल कार्यास सर्वांनी सहकार्य करावे. अशी विनंती करावी. देवासमोर उद्बत्ती लावून पानाचा विडा व नारळ देवापुढे ठेऊन परमेश्वरा तुझ्या साक्षीने हा सर्व व्यवहार ठरला आहे तो आपल्या आशिर्वादाने यशस्वीपणे हे मंगलकार्य पार पडू ! अशी प्रार्थना करावी.
विवाह तिथी निश्चय : विवाहास वैशाख, जेष्ठ, मार्गर्शीर्ष, माघ, फालगुन हे पाच महिने शुभ होत. पौष महिन्यात लग्न, मुंज वगैरे शुभ कार्य करीत नाहीत मकर राशीला सुर्य असताना पौषमास विवाह कार्यास ग्रा( सांगितला आहे. पौष महिन्यात गैर असे काही नाही.
आशाढ शु.11 पासून शु.11 पर्यंत चातुर्मासाच्या काळात विवाहाच्या तत्सम अन्य शुभ कार्याच्या निषेध सांगितला आहे. परंतु स्थळे पहाणे, प्राथमिक बोलणी, साखरपुडा करणे या गोष्टी करण्यास हरकत नाही. कोणत्याही महिन्यातील अमावास्या निषीद्ध समजावी पितृपंधरवडा ऐभाद्रपद कृष्णपक्ष संपूर्ण वर्ज्य, चंद्र, सूर्य ग्रहण, त्यांचे करदिवस असे अशुभ दिवस वर्ज्य तसेच भरणी, कृतिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेशा, पूर्वा फाल्गुनी, विशाखा ज्येष्ठ, पूर्वाषाढा, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्रे विवाहास अशुभ होत.
अशौचः मंगलकार्याचे पूर्वी अशौच आले तर अशौचात लग्न मुंजीसारखे मंगलकार्य करू नये कारण अशौच आले तर ते प्रतिकुल होते. माता पिता यांचे निधनानंतर एक वर्ष होई तो घरात. मंगल कार्य करू नये. अडचणीचे प्रसंगी सर्व मासिक द्धे झाली असल्यास मंगल कार्य करण्यात हरकत नाही. तसेच ज्या वर्षात घटना घडली ते वर्ष (संवत्सर) पालट होत असेल तर कार्य करण्यास हरकत नाही असे शास्त्र सांगते.
निमंत्रक पत्रिका: विवाहविषयक बैठकीत बोलणी नक्की झाली, विवाह दिनांक व स्थळ वगैरे निश्चित झाले की समाजाला आमंत्रण देणे महत्त्वाचे असते. आमंत्रणास सुरूवात करण्यापूर्वी प्रथम कुलदेवता, इष्टदेवता, तुलस ग्रामदेवता यांचे पासून आमंत्रणास सुरूवात करावी. शहरात राहणाऐयांनी आपले मोठे कुटूंब ज्या गावी राहते. त्या गावी किंवा आपल्या मूळगावी जाऊन कुलदेवता, तुलस ग्रमदेवता यांचे पासून आमंत्रणास सुरूवात करावी. शहरात राहणाऐयांनी आपले मोठे कुटूंब ज्या गावी राहते. त्या गावी किंवा आपल्या मूळगावी जाऊन कुलदेवता, ग्रमदेवता यांना प्रथम आमंत्रण द्यावे. पानाचा विडा देवासमोर (देव्हाऐयात) ठेवणे त्यावर हळद, पिंजर, अक्षता वाहणे. सोबत आमंत्रण पत्रिका ठेवणे व उभयतांनी हात जोडून कुलदेवतेला मंगल कार्याला उपस्थित राहून शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर गावातील प्रमुख देव देवतांना जाऊन आमंत्रण द्यायचे असते. खास नातेवाईकांना उभयतांनी आमंत्रण पत्रिका सोबत फळ देऊन आमंत्रण करावे. फळ पुन्हा ते आमंत्रणकर्त्याच्या हातात परत देणे. सौभाग्यवतीस सुहासिनीस हळद पिंजर लावून हातावर अक्षता देते व आमंत्रण करते. आमंत्रणकर्त्याने डोक्यात टोपी अवश्य घालावी व सौभाग्यवतीने नाकात नथ हे सौभाग्याचे प्रतिक ! लग्नात मिळालेली नथ कपाटात न ठेवण्यापेक्षा शुभप्रसंगी तिचा वापर करावा. संस्कृतीचे जतन करावे.नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर ही महाराष्ट्राची परंपरा आहे, ज्ञातीचे भूषण आहे, मांगल्याचे प्रतिक आहे. सात्विक सौंदर्य आहे. आमंत्रण करण्यासाठी आलेल्या सुवासिनीची ओटी भरणे ही देखील सामाजिक परंपरा आहे. (गरोदर स्त्रघ्ची ओटी भरत नाहीत हातात कापड द्यावा.) तसेच वधू वर सोबत असल्यास त्यांच्या हातावर साखर ठेऊन तोंड गोड करण्याची प्रथाही आहे.
केळवण: विवाहाचे पूर्व दिवशी वधूऐवर यांचे घरचे केळवण असते त्यादिवशी कुलाचाराप्रमाणे देवदेवतांचे मान काढले जातात. त्याला काही ठिकाणी उपले काढणे. असे म्हणतात. (तांदुळ, पानाचा विडा, दोन देठांची पाने व त्यावर अखंड सुपारी) त्यावर दक्षिणा ठेवणे, नारळऐविडयावर हळद, पिंजर, फुले वाहणे अशारितीने प्रत्येक देवतेच्या नांवाने उलपे तयार करतात. शुभ कार्यासाठी त्याऐत्या देवतांना आवाहन करावे व शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आशिर्वाद मांगावा व आशारितीने सर्वाना हात जोडून प्रार्थना करावी. त्यानंतर देवासमोर मांडलेले उलपे व्यवस्थित जागी उचलून ठेवले तरी चालतात. वधूऐवर यांचे घरी हळद लावण्याचा विधी होतो. त्यांना स्नान घालण्यात येते. दुपारी गोड (जेवणाचा ) भोजनाचा देवाला नैवेद्य दाखवितात व भोजन विधी होतो. विवाहकार्य पार पाडल्यानंतर काढलेले उपल्यामधील नारळ त्या त्या देवतांचे नाव घेऊन मानवावे लागतात.
सिमोलंघन करून बाहेर गावी जाणाऐया वधूऐवर यांना उलपे काढणे हा प्रकार विवाह दिवशी, विवाह मंडपीही केला जातो.
व्याही भोजन: कन्यादान करणाऐया दंपतीला मुलीचा विवाह झाल्यानंतर तिला मुलगा होईपर्यंत तिच्या घरी भोजन करता येत नाही. म्हणून मुलाचे आईवडिल वधूच्या आईऐवडिलांना मुलांचा विवाहविधी होण्यापूर्वी आपल्या घरी भोजनास बोलवतात.
सिमान्त पुजन: लग्नासाठी आलेल्या वराचा गावच्या सिमेवर वधूपक्षा कडून होणारा सत्कार म्हणजे सिमान्त पूजन सध्या मंगलऐकार्यालयातच हा विधी केला जातो. बहुदा विवाह पूर्व रात्री हा विधी करतात. साखरपुडा विधी या अगोदर झाला नसेल तर तो विधीही विवाह पूर्व रात्री करतात.
विशेष सूचना ऐ वधू/वर लग्नस्थळी किंवा मंगल कार्यालयातच जाताना काही खास ठिकाणी सिमेवर तेथील महितगार मंडळीच्या मार्गदर्शनाने वधू/वर यांचे अंगावरून नारळ काढून तो फोडून टाकतात. तसेच मार्गात येणाऐया मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन पुढे जातात. अशा वेळेस देवा समोर पानाचा विडा ठेवतात. त्यासाठी वधू/वर यांचे बरोबर असणाऐया प्रमूख व्यक्तीने पिशवित 2/3 नारळ पानचे विडे, अक्षता वगैरे जवळ ठेवावेत.
विवाह अंतर्गत विधी:घाणाभरणे, हळद लावणे, पुण्यहवाचन, देवकप्रतिष्ठा, वरघोडा, गौरीहरपूजन, जानवसे, मंगलाष्टके, सूत्रबंधन, कन्यादान, विवाहहोम, प्राणिग्रहण, लाजाहोम, सप्तपदी, गृहप्रवेश.
स्त्रियांचा सहभाग असल्याशिवाय विवाह विधीस पूर्णता व रंगत येत नाही. वाङःनिश्चयापासून उंबरठयावरील उजव्या पायाच्या अंगठयाने मप लोटून लक्ष्मीनारायणाचा जोडा गृह प्रवेश करेपर्यंत स्त्रिाांचा सहभाग फार महत्वाचा असतो.हळद लावणे, घाणा भरणे, नाव घेणे, उखाणे, नाव घेणे, ओटी भरणे, प्रसंगानुरूप गाणी म्हणजे याशिवाय विवाह विधीस पुर्णतः रंगत येणे शक्य नाही.
लग्नमंडपी प्रवेशद्वाराजवळ केळीचे तोरण बांधावे. वधू/वर या तोरणातूनच प्रवेश करतात. रांगोळया काढाव्या, विवाह विधीचे मांगल्य व पावित्रय वाढविण्यासाठी सनईचे मंगल सूरच पोषक असतात. मुहूर्तमेढ म्हणून खांबाला आंब्याची डहाळी बांधतात. त्याला एक नारळ बांधतात. पिवळया कपडयात सुपारी, हळकुंड, बिब्बा नारळाजवळ बांधतात . यालाच मुहूर्तमेढ म्हणतात.
विवाहाचे दिवशी पुण्याहवचन विधी सुरूवात करण्यापूर्वीची तयारी : यजमानांनी सोवळे नेसले असल्यास अंगावर उपरणे घ्यावे. पोषाख केला असल्यास डोक्यात टोपी अंगावर उपरणे घ्यावे. यजमानीने अंगावर शाल घ्यावी. (विधीला सुरूवात करतांना उपरणे व शाल यांची गाठ मरावी लागते.) वधू माहेरची साडी नेसते. वरासाठी सोवळे उपरणे किंवा पोषाख लेंगा झबा वगैरे असावा वधू/वर यांना मोत्याच्या मुंडावळया बांधतात. इष्ट देवता, कुलस्वामी, वडिल माणसे व भटजी यांना यजमानांनी(उभयतांनी) नमस्कार करावा. व त्यानंतर पुण्याःहवाचन करण्यासाठी बसावे. पुण्याःहवाचन वधुऐवर यांच्यामागे करा व कुरवंडी घेऊन करवल्या उभ्या असतात. त्या नंतर मंडप प्रतिष्ठा गणेश पुजन करून पुण्याःहवाचन करतात. देव ऋषि व आचार्य या तिघांनाही पुण्याःहवाचनात देव ऋषींना आनंद होतो व ते संपुष्ट होतात तसेच नांदीद्ध केले जाते त्यामुळे पितर संतुष्ट होतात व शुभ कार्यास त्यांचा अशिर्वाद मिळतो. मंगल कार्याची वृद्धी होते.
हळद लावणेः वधू पक्ष कडील सवासिनी अंब्याच्या पानांनी वराला हळद चढवितात व ती उष्टी हळद वरपक्षातर्फे वधूला चढविली जाते. त्यावेळेस वधूला हळदीची साडी व तेल साडी वर पक्षाकडून दिली जाते. हळद घेऊन येणाऐया स्त्रिाांची ओटी भरून मान दिला जातो अशी आपल्या समाजात पद्धत आहे.
घाणा भरणे: (हा विधी देवक बसण्यापूर्वी करावयाचा असतो) एका रोवळीत पसाभर गहू किंवा तांदूळ घेऊन त्यात एक हळकुंड, एक सुपारी ठेवतात. रोवळीत पाच मुसळे,मुसळे नसेल तर काठ्या घेतात.त्यांना सुत गुंडाळतात मूसळाच्यावर आंब्याचा टाळा बांधतात.पाच सुवासिनी,यजमान-यजमानिना,वधू-वर मूसळाना हात लावतात.वराच्या/वधूचा मामा मूसळानच्या वर तळीधरून उभा राहतो.(तळी म्हणजे ताम्हनात ,नारळ ,तांदूळ निरंजन व पानाचा विडा ठेवलेला असतो)व घाना भरण्यास सुरवात होते.त्यावेलास स्त्रिया गाणे म्हणत असतात.व त्या गाण्यात गणेश ,कुलदेवता व इष्ट देवतांना कार्यसिधीस नेण्यासाठी आशीर्वाद मागण्यात येतो.धान्याची उणीव पडू नये सर्व आबादी आबाद असावे यासाठी विनंती करतात.घाना भरण्या वेली पुढील गाणे म्हणतात.
घाना जो भरीला | विडा जो ठेविला |
आदि देव नमिला गणराज ||
गणराज यावे पटवारी बसावे |
एवढे कार्य सिद्धीस न्यावे ||
घाना जो भरीला | सवाखंडी भाताचा ||
कुलस्वामिनी यावे पाटावरी बसावे |
एवढे कार्य सिद्धीस न्यावे |
देवक प्रतिष्ठा: विवाह,उपनयन या सारखे मांगी सोहळे अविघ्न पार पडावेत म्हणून मंडपदेवता व विघ्नहर्ता श्रीगणेशा यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे.यालाच देवक ठेवणे म्हणतात.
एक कोऱ्या सुपात किंवा परडीत आब्यांच्या पानाच्या सहा गुंडाळ्या ठेवतात.सूत्रवेष्ठित नारळ ठेवतात.हा नारळ कुलदेवतेचे प्रतिक असतो.पांढऱ्या रंगाचे गाडगे घेतात त्यात अक्षता,हळकुंड,सुपाऱ्या ठेवतात.त्यावर मातीचे झाकण ठेवतात.त्याभोवती सुत गुंडाळतात हे सूत्र वेष्ठित गाडगे म्हणजे अविघ्न कलश म्हणतात.त्यालाच अविघ्न गणपती म्हणतात.आंब्याच्या पानाच्या सहा गुंडाळ्या म्हणजे नंदिनी,नलिनी,मैत्रा,उमा,पशुवार्धिनी व शास्त्रगर्भा भगवती या देवता होत.या सर्वाना आवाहन करून पूजन करतात.देवक पूजन झाल्यानंतर घरातील देवाजवळ किंवा हॉलमध्ये वधू-वर आपापल्या जागेत ईशान्य कोपऱ्यात देवकांची स्थापना करतात.
देवक प्रतिष्ठा ज्यात केलेली असते ते सूप किंवा / परडी घेऊन यजमान याजमानिना वर/वधू व टोकांना असे सर्वजण त्यांना नेमून दिलेल्या जागेत जाण्यासाठी निघातात .त्यावेळेस या मंडळीच्या डोक्यावर सफेद छत्र धरले जाते योग्य जागी आल्यानंतर तेथे पाटावर देवक मांडून त्यांचे बाजूला समई प्रज्वलित करून ठेवतात.यानंतर घरचा आहेर होतो.नात्यातील संबंधित आपापल्या ऐपतीनुसार वधू-वर याजमानिना हळद, पिंजर, अक्षता ,लावून आहेर करतात.यजमान आहेर करणाऱ्यांना नारळाचा मान देतात.
वरघोडा-(वराचे विवाह स्थळी आगमन): विवाह मुहूर्ताआधी वराला लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराशी - तोरनापाशी नवरदेव उभे राहतात.सोबत कुरवंडी करा घेऊन करवल्या असतात.टोकना व इष्ट मित्र हि असतात.
वधूची आई व इतर सुवासिनी प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या नवरदेवाची दृष्ठ काढतात आरती करतात.(नवरदेव आरतीचा मान देतो)नंतर वधू-पितापालक नवरदेवाला उजवा हात धरून लग्न मंडपात घेऊन येतो.
जानवसे(मधुपर्क पूजन): वधू-पिता-वरचा उजवा हात धरून लग्न मंडपात येतात.जन्वस्यासाठी वराला बोह्ल्याच्या जवळच पाटावर बसविण्यात येते.नवरदेवाच्या उजव्या बाजूला पाटावर टोकना बसतो.वधू माता-पिता वरचे पाय धुतात,कोऱ्या वस्त्राने पाय पुसतात.वराचे पूजन करतात,मिठाईचे ताट त्याचे समोर ठेवतात.याजमानातील नवरदेवाला गोड पदार्थ भरविते.वराला अंगठी ,पोशाख देण्यात येतो.वराबरोबर असलेल्या टोकण्याचाही सत्कार केला जातो.
गौरीहरपूजन: देवक प्रठीष्टनानंतर वधू आपल्या देवाकाजवळ मनोभावे गौरी-हर (पार्वती-शिव)यांची अक्षता वाहून पूजा करत बसलेली असते.देव्काच्या परडीत अन्नपूर्णा देवीची व बालकृष्ण्नांची चांदीची/पितळेची मूर्ती ठेवायची असते.देवकाच्या पाया पडायला नवदांपत्य येते तेव्हा नवरदेव ती मूर्ती उचलून आपल्या बरोबर घरी घेऊन जातो.हि अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात ठेवावी जमली तर नित्य पूजा करावी.
मंगलाष्टके (अन्त:पट): जानवसे (मधुपर्क)झाल्यावर सुमुहूर्त जवळ आला कि वधू-पिता वरचा उजवा हात धरून बोहल्यावर घेऊन येतो.वराने उजवा पाय पाटावर ठेवून उभे राहवे.वधूवरामध्ये अंत:पट धरला जातो.दरम्यान वधू-वरांच्या तोंडामध्ये पानांचा विडा दिला जातो.मंगलाष्टकांना सुरवात होते.तेव्हा वधूचा मामा वधूला घेऊन बोहल्यावर येतो.वधूने हि उजवा पाय प्रथम ठेवून पाटावर उभे राहावे.मंगलाष्टके चालू असताना वधू-वर यांनी अंत:पटावरील स्वस्तिकाकडे पाहत कुलदेवतेचे स्मरण करत असावे.अशा शुभमंगल प्रसंगी कोणतेही अनिष्ट घडू नये म्हणून वधू आणि वर यांच्यापाठी मामा किंवा एक व्यक्ती उजव्या हातात धारदार शास्त्राला लिंबू टोचून उभी असते.
मुठीतील अक्षता वधू-वरच्या डोक्यावर पडतील अशा रीतीने लिंबे डोक्यावर धरलेली असतात.(अंत:पात काढल्यानंतर ती लिंबे उभी कापून बाहेर फेकून द्यायची असतात).वधू-वर यांचे तोंडात दिलेल्या पानाचा विडा अंत:पात काढल्यावर थुंकून टाकायचा असतो.मंगलाष्टके संपली (शुभमुहार्ताची वेळ झाली)कि अंत:पात उत्तरेच्या बाजूने काढावा.नंतर वधूने वराच्या व वराने वधूच्या डोक्यावर हातातील अक्षता,गुल-जिरे एकमेकाच्या मस्तकावर घालाव्यात एकमेकाकडे प्रेम भावाने पाहण्यास सांगावे.वधूने प्रथम वराला वरमाला घालावी व नंतर वराने वधूला पुष्पमाला घालावी.यानंतर वधू वरांनी आपापल्या जागा बदलून पाटावर बसावे.पाच वेळा एकमेकांच्या मस्तकावर अक्षता टाकाव्या त्यानंतर वधू-वराने पुन्हा आपापल्या जागी स्थानापन्न व्हावे.
सुत्राबंधान(सुतबंधन): दोर्याने वेढे घालणे.मानवी जीवनाची अखंडता (पूर्ण)आयुष्य दर्शिव्ण्यासाठी संस्कार करतात व मंगल प्रसंगी सुत वेष्ठान करतात.वास्तुशांतीच्या वेळी सुत्र वेष्ठन करतात वास्तुशांतीच्या वेळी सुत्रवेष्ठन करतात.सुत्रावेष्ठानासाठी दोर वापरतात.दुध प्रोक्षण केलेले दुपदरी पांढरे सुतांचे पाच फेरे घालतात.चार टोकाला चार माणसे (भटजीसह)उभे राहून पाच फेरे वधू वर यांचे कंठाच्या उंचीचे व कमरेच्या उंचीचे घालण्यात येतात.काम्रेभोव्ताल्चे पाच फेरे पाताखाळून काढावेत व सुतास पिल्डेऊन त्यास हळकुंडा बांधतात.त्यला पिंजर लावतात.वरून काढलेले सुत वराने वधूच्या डाव्या मनगटावर बंधने.दुसरे सुत वधूने वराच्या उजव्या मनगटात बांधावे.
कन्यादान: कन्यादान झाले याचा अर्थ या कन्येवर त्या वरची मालकी झाली कारण जी वस्तू दान द्यावयाची त्या वस्तूवरील आपली मालकी नष्ठ करून ज्याला ती वस्तू द्यावयाची त्याची मालकी निर्माण करणे म्हणजे दान होय.
वधूच्या ओंजळीवर वराची ओंजळ त्यावर कन्येच्या पित्याची ओंजळ व त्या हातावर कन्येची आई पाण्याची संतत धार धरते व हे पाणी खाली काशाचे भांड्यात पडत असते.नंतर वधूच्या माता-पित्यांनी लक्ष्मीनारायण स्वरूप वधु-वरांना वाकून नमस्कार करावयाचा असतो.एवढा श्रेष्ठ विधी दुसऱ्याकोणत्याही धर्मात नाही हीच उद्यात भारतीय संस्कृती होय.नंतर वरांच्या हस्ते वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यात येते.व इतर अलंकार देण्यात येतात.नवीन लग्नाचा शालू व मोठी ओटी (मोठी ओटी-पाच नारळ पैकी आसोल नारळ,अक्रोड,बदाम,खारीक,सुपारी,हळकुंडा प्रत्येकी पाच,तीन ओजाल्भर गहू,चांदीचा करंडा,फनी,भंगसाळ)देतात.
विवाह होम: कन्यादान झाल्यावर वराची वधूवर मालकी हक्क स्थापना झाली.परंतु ती भार्या होण्यासाठी विवाह होम हा विधी केला जातो.नवदांपत्याकडून प्रथमच योजकनामक अग्निपूजा केली जाते.हा होम करताना वराने संकल्प करावयाचा असतो.स्वीकार केलेल्या या वधूला भार्यात्व प्राप्त व्हावे व गृह्याग्नी सिद्ध व्हावा यासाठी मी हा विवाह होम करीत आहे. प्राणी ग्रहण : प्राणी म्हणजे हात,ग्रहण म्हणजे घेणे,वधु बसलेली असते.वर उभा राहून वधूचा उजवा हात आपल्या हातात घेतो.सौभाग्यासाठी तुझा हात हातात घेतला .म्हणजे पती म्हणून पत्नीचा संपूर्ण जबाबदारी घेतल्याचे हे प्रतिक आहे.
लाजाहोम(लाह्या होम): सालीच्या लाह्या हे समृद्धीचे प्रतिक| प्रपंचात समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून लाह्याचे हवन करणेस सांगितले आहे.या लाह्या भावाने बहिणीच्या ओंजळीत घालावयाच्या असतात.भाऊ बहिणीला सांगतो कि मी लाह्या रूपाने माझे प्रेम भरभरून देत आहे असे प्रेमाचे आश्वासन देतो.नंतर पती पत्नी त्या लाह्या होमात सोडतात.यज्ञकुंडला प्रदिक्षणा घालतात.असे तीन वेळा करतात.य वेळेस कानपिळीचा कार्यक्रम होतो,वधूचा भाऊ नवरदेवाचा कान पकडून बजावून सांगतो कि माझ्या बहिणीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा.पती या नात्याने पत्नी विषयीचे आपले कर्तव्य पार पडावे.वधूच्या भावाला वर पक्षाकडून मन दिला जातो.(कपडा वैगरे भेटवस्तू देतात) सप्तपदी :होमाच्या उत्तरेस घातलेल्या तांदळाचा सात राशीवरून वराने वधूचा उजवा हात आपल्या हातात धरून चालवावे.प्रत्येक राशीवर वधूने उजवा पाय ठेवावा.अशा रीतीने सप्तपदीचे सात मंत्राचा अर्थ वधू-वर यांनी जाणून घ्यावा.अग्नीच्या साक्षीने लग्नाच्या मुलाने व मुलीने जीवनात पती-पत्नी म्हणून राहण्याचे व गृहस्थाश्रम योग्य प्रकारे पाळण्याचे अग्नीला दिलेले वचन असते.चार वेळा अग्नीला वचन दिल्यावर अग्नीसमोर दोघेजण उभे राहतात.लग्नाची वधू आपल्या पायाने सानेला (शिळेला)स्पर्श-करून वराला वचन देते कि ध्रुव व रोहिणी जशी आपापल्या जागी स्थिर आहेत.त्या प्रमाणे मी तुझ्या आयुष्यात स्थिर राहीन.हि दोघांची परस्परांना दिलेली वचने अग्नीच्या साक्षीने झाल्यावर दोघेजण अग्नीच्या बाजूला सात पावले एकत्र टाकतात यालाच सप्तपदी असे म्हणतात.सात पावले दोघांनी बरोबर चालले म्हणजे ती सखी होते.विवाह होम झाला म्हणजे तिला पत्नीत्व येते व धार्मिक कृत्याचे वेळी पतीच्या बरोबर बसण्याचा अधिकार प्राप्त होतो व पुण्याचा अर्धावाटा तिला मिळतो.
सप्तपदी झाली म्हणजे विवाह संस्कार पूर्ण होतो व त्याला कायदेशीर पात्रता येते.सर्व कृत्ये झाली तरी सप्तपदी होईपर्यंत विवाह कायदेशीर ठरत नाही.पहिले पाऊल टाकताना वराने म्हणावे,
"इष एकपदी भाव सामामनुव्रताभाव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय : ||१||
(हे वधू,तुझे माझे साख्य झाले आहे.तू अन्नपूर्णा व दीर्घायू संततीची माता हो.)
तांदळाच्या दुसऱ्याराशीवर वधूने दुसरे पाऊल ठेवल्यावर वराने म्हणावे,
"उर्जे द्विपदी भव सा,मामनुव्रता भव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय :||२||
(हे वधू,तू दोन पावले चालली आहेस,म्हणून मला शरीर सामर्थ्य वाधीव्ण्यास सहाय्यक हो | मला बाल्वार्धिनी हो )
तिसरे पाऊल टाकताना म्हणावे,
रायस्पोषाय त्रिपदी भव सा,मामनुव्रता भव|
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय : ||३||
हे वधू तू मजबरोबर तीन पावले चाललीस म्हणून मला धनवर्धिनी हो.)
चवथे पाऊल टाकताना
"मा यो भव्याव चतुष्पदी भव सा,मामनुव्रता भव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय :||४||
(हे वधू तू चार पावले चालली आहेस.या चौथ्या पावलाने तू माझी सुखवर्धिनी हो.)
पाचवे पाऊल टाकताना
"प्रजाभ्य:पंचपदी भव सा,मामनुव्रता भव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय :||५||
(हे वधू तुझे पाचवे पाऊल संतातीवर्धक होवो,आपल्या पुरेसे संतती सुख मिलो.)
सहावे पाऊल टाकताना म्हणावे,
ऋतुभ्य : ष्टपदी भव सा ,मामनुव्रता भाव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय :||६||
(हे वधू ,तू सहा पावले चालली आहे,म्हणून वर्षातील वसंतादी सहा ऋतुप्रमाणे तू फलदायी हो.)
सातवे पाऊल टाकताना,
"सखा सप्तपदी भव सा ,मामनुव्रता भव |
पुत्रान्वीदावहै बहुंस्ते संतू जरदष्टय :|| ७||
(हे वधू ,तू सात पाऊले चालली आहेस म्हणून अत्युत्कृष्ठ सुख देण्यासाठी तू माझी प्रिय सखी हो.)
हि सात पावले टाकताना परस्परांची वस्त्रे गाठ मारून जोडलेली असतात.सप्तपदी पुरी झाल्यावर हि गाठ सोडावी.
रजिस्टर लग्नाने हे मिळत नाही.त्यासाठी धार्मिक विधी करावा लागतो.हे सर्व विधी झाले म्हणजे ती अर्धांगी होते.असे वेदांनी म्हंटले आहे.लग्नापूर्वी ती कुमारिका असते लग्न झाल्यावर ती ज्या प्रमाणे नदी सागराला मिळते व एकरूप होते त्याप्रमाणे ती पतीशी एकरूप होते. त्यानंतर वधुचे नामकरण व देवक उठविणे हा विधी केला जातो.अशा रीतीने विवाहाची सांगता होते.
भोजनविधी: विवाह मुहूर्त सकाळचा-दुपारचा असेल तर अंत:पट हा विधी झाल्यावर देवांना नैवेइद्य दाखवून बाहेर काकबळीसाठी पण ठेवून नंतर भोजन समारंभास सुरवात करतात.यजमान हातात अक्षता घेऊन हर हर महादेव असे म्हणून उदक सोडतात.व मंडळी हि त्यला प्रतिसाद देऊन भोजनास सुरवात होते.सुरवातीला खालील श्लोक म्हणणे उचित असते. वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे |
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
घास देणे: विवाह दिनी वधू-वर शेजारी जेवायला बसतात,यावेळी वधू नवऱ्याचे नाव उखाण्यात घेत त्यला घास भरवते.हि लौकीक प्रथा आहे.
रुखवत: सध्या विवाह पद्धतीत रुखवताला महत्व दिले जात आहे.नववधूस संसारपयोगी वस्तू दिल्या जातात.अशा वस्तूंची लग्न मंडपात स्टेजच्याजवळ आकर्षक मांडणी करून ठेवतात.यात कन्यादानासाठी आंदनाची भांडी ठेवली हि ठेवलेली असतात.अन्दानात मुख्यत:प्रत,समई,तांब्याच ताम्हन,तांब्या,पणपात्र,काश्याची वाटी हे असावे लागते बाकी प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे असते.
नवदाम्पत्याचा गृहप्रवेश : गृहप्रवेशासाठी आगावू गुरुजीना विचारून शुभमुहर्त काढून ठेवावा.व त्या शुभवेळी गृहप्रवेश करणे उत्तम होय.(काही हौशी मंडळी वाजत गाजत वरात काढतात व नंतर गृहप्रवेश करतात.)(त्यावेळस ठराविक ठिकाणी दोघांच्या अंगावरून नारळ काढून फोडून टाकतात.)
अशा रीतीने लक्ष्मी नारायणाचा जोडा गृहप्रवेश्द्वारात येतो.वधूवरावरून दहीभात ओवाळून टाकतात.विवाहसोहळा संपला कि सत्यनारायण करणे,कुलदेवतेचे दर्शन घेऊन येणे.गोंधळ घालणे हि धार्मिक कृत्यही वेळच्या वेळी करणे चांगले असते.सुवासिनी त्यांची आरती करतात.भाताचे मुटके दांपत्याचा अंगावरून ओवाळून टाकतात.औशन करतात नाव घेणे कार्यक्रम होऊन गृहप्रवेश होतो.नाव-वधु-उजव्या पायाने उंबरठ्यावरील माप लोटून गृहप्रवेश करते.प्रवेशद्वार पासून देवघरापर्यंत पायघडी घालतात.पायघडीवरून नवदांपत्य देवाजवळ येऊन नमस्कार करून बसतात.काहीजण देवाजवळ अनास मांडतात.
अनस मांडणे: तांब्यावर तांबे असे चार तांबे पाटावर मांडतात.एका तांब्यावर सुपाऱ्या,दुसर्यात हळकुंडे,तिसर्यात खारका व चौथ्या तांब्यात मुहूर्तमनी (एकसर)लपवून ठेवतात.वधूने हा एकसर शोधून काढावयाचा असतो.हे करत असताना गाणेही म्हणतात.
अनस मांडिले नानापरी | त्यात लक्ष्मी वास करी ||
तिच्या हाताला काही लागे | तिच्या हाताला लागल्या सुपाऱ्या ||
अशा रीतीने वधूच्या हाताला जे लागेल त्या वस्तूंची नवे गाण्यात म्हंटली जातात.यामुळे या प्रसंगाला वेगळीच मज्जा येते.ओत्सुक्त निर्माण होते.वधूने एकसर शोधून काढल्यावर तो एकसर पतीच्या हस्ते तिच्या गळ्यात बांधला जातो.
मग नाव दांपत्य कुलस्वामीच्या व देवतांच्या पाया पडतात.घरातील जेष्ठ मंडळीना वाकून नमस्कार करतात.जेष्ठ मंडळी विशेषता सर्वात जेष्ठ व्यक्ती प्रेमाने नव दाम्पत्याचे तोंड साखर भरून गोड करते.यामुळे घरातील सर्व मंडळीना आनंदाचे उधान येते.वास्तूही समाधानाने भरून जाते.विवाहाचे दुसरे दिवशी नवविवाहित दांपत्याचा स्नानाचा कार्यक्रम असतो.मुंबईत जागे अभावी करता येत नाही.जेथे शक्य असेल तेथे करतात.वधु वर यांना समोरासमोर पाटावर बसवतात.दोघांच्या मध्ये ताम्हनात किंवा परातीत पिंजर युक्त लाल पानी करून त्यात सुपारी ठेवतात.हि सुपारी नवरदेव शोधून आपल्या मुठीत घट्ट धरून ठेवतात.नववधू वराच्या मुठीतून सुपारी काढण्याचा आटोकाट प्रयत्न करते.नंतर नववधू सुपारी लपवून ठेवते व वराने ती शोधून काढ्याची असते.नंतर दोघांना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम होतो.वधु वराच्या हातात बांधलेली हळकुंडे सोडण्याचा कार्यक्रम केला जातो,त्याला हळद उतरणी असेही म्हणतात.हळद उतरणी वधूगृही/वरगृही जेथे शक्य होईल थेथे केले जाते. सुनमुख:वरमाता वधूला जे वस्त्रालंकार देते,त्याला सुनमुख म्हणतात.तसे करताना सुनेच्या मुखात साखर घालते.
ऐरणी दान: ऐरणी म्हणजे वेळूची (बांबूची)दली.ऐरणी वंशवृधीचे प्रतिक ठरते. कन्या पिताने वराच्या मातेला ऐरणीदान करायचे असते. हल्ली वरमातेला वस्त्रपात म्हणजे साडी चोळी देण्यात येते.
नवविवाहित सुवासिनीला गौरी ओवसण्याचे व्रत करावेच लागते ढ़ चैत्र गौरीचे पूजन ¸ वणात मंगळा गौरीचे पूजन भाद्रपद तृतीयेला हरतालिका व्रत व भाद्रपद अष्टमीस अनुराधा नक्षत्रावर अशा रितीने गौरी मातेचे आदिमाया पार्वतीचे पूजन हे प्रत्येक सुवासिनीस करावेच लागते. तुमच्या घरी गणपती, गौरी येत नसेल तर जेथे गौर बसविले जाते तेथे जावून ओवसा करावा लागतो.
गौरीचा ओवसा: सोन्याचे मणीमंगळसुत्र काळे मणी व एक सोन्याचा मणी ओवून मंगळसुत्र करावे. खण, नारळ, तांदुळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, अक्रोड, बदाम खारीक, पाच त-हेची फळे, पाच प्रक्रारची मिठाई, पाच भोपळयाची पान इत्यादी वस्तूनी नवीन सूप सजवून सुवासिनी ते सुप गौरीच्या पुढयात ठेवतात. गौरीला नमस्कार करतात व आपल्या मनातील इच्छा सांगतात.
सौभाग्यवर्धक व्रते: वटसावित्री, हरतालिका, मंगलागौरी ही नित्य वार्षिक सौभाग्यवर्धक व्रते आहेत. वटसावित्रीव्रत हे पतीचे महागंडांतर टाळण्यासाठी, मंगलागौरी हे अपमृत्युनिवारक व हरतालिका हे इच्छित वर प्राप्त करून देणारी व्रते आहेत.
संततीदायक व्रत: पिठोरी आमावास्या, शनिप्रदोष व मास पंचमीव्रत ही तिन्ही प्रामुख्याने संतती विषयक व्रते आहेत.
ऋषी पंचमी: या व्रतामुळे रजोदर्शनकाळात स्त्रI च्या वासना देहावर व मनोदेहावर झालेले कु संस्कार महापावन अशा ऋषींच्या स्मरणाने नष्ट होतात. रजोदर्शन काळात स्पर्शास्पर्शाचे सर्व नियम पाळणे शक्य नसल्याने कळत नकळत घडलेल्या दोषांचे परिमार्जन होण्यासाठी हे व्रत करणे आवश्यक आहे. विवाहानंतर वधूने सासरी व माहेरी राहण्याचे नियम:ऐ विवाह झाल्यानंतर येणाऐया पहिल्या चैत्र महिन्यात वधूने माहेरी राहू नये ते पित्यास अशुभ म्हणून सांगितले जाते. जेष्ठ महिन्यात सासरी राहिल्यास स्वतः वधूला अशुभ व अधिक मासात पतिस अशुभ सांगितलेले असते.अर्थात ज्यास अशुभ म्हणून सांगितलेले असते ती व्यक्ती हयात तेथे राहत नसल्यास प्रश्नच उद्भवत नाही.
नवीन विवाह झालेल्या पतीपत्नीमध्ये वैवहिक व वैचारिकदृष्टया सुसंगति आलेली नसते. मने अजुन जुळलेली नसतात. जी जुळल्यासारखी वाटतात त्याला शारिरीक आकर्षण व विषयपूर्ती ही कारणे असतात. अशा वेळेस विषयपूर्तीचा अतिरेक आरोग्यास अपायकारक ठरतो म्हणून सतत वर्षभर स्त्रIऐपुरूष संपर्क घडणे हे इष्ट नव्हे. यासाठी वधूने रहावयास नियम शास्त्रने करून ठेवलेले आहे.
Comments
Post a Comment