सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेयसाहीत्याचे वाटप

सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेयसाहीत्याचे वाटप

*सेवा नरहरींची....*🚩
*सेवा समाजाची.....*🚩
*सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेयसाहीत्याचे वाटप....*

सेवा नरहरींची या उपक्रामांतर्गत सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेयसाहीत्याचे दप्तर, डबा,पाणी बोटल, वही,पेन, पेन्सिल, कंपास, रंग खडू, रजिस्टर, चित्रकला वही, बूट आदीचे वाटप करण्यात आले, परसावत नगर परभणी येथील श्री छ्त्रपती शाहू विद्यालय येथे कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रास्तावीक अतुल काटकर यांनी केले तर सौ.अंबिकाताई डहाळे, बाळासाहेब रोडे, प्रमोद शहाणे आदींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपार मार्गदशन केले.







समाजातील मुलगी शिकली म्हणजे कुटुंब शिकले, उच्च शिक्षीत मुलींना त्यांच्या योग्यते प्रमाणे उपवर मिळू शकतो, चांगल्या कुटुंबात त्यांचा विवाह होईल व पुढील जीवन सुखकर होईल, हा उद्देश समोर ठेवून समाजातील गरजूवंत विद्यार्थ्यांनींना सर्व शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सोनार समाज माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ व सुवर्णकार असो. जिल्हा संघटक अमोल पांगरकर, दैवज्ञ सोनार समाज अध्यक्ष बाळासाहेब रोडे, अतुल काटकर, सोपानराव शहाणे, बबनराव बोकण, बाळू डहाळे, किरण शहाणे, नाना मैड, अशोक ताक, दिनेश शहाणे, विजकुमार डहाळे, गोविंद शहाणे, संजय बोकण, विश्वाजीत काटकर, राम कुलथे, कैलास शहाणे, दिणेशा डहाळे आदी समाजातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थीत होते..

@PARBHANI SONAR SAMAJ

Comments