गोत्र-देवक-गोत्रावली
सुष्टी निर्माण झाली तेव्हा मानव रानटी अवस्थेत होता. त्या काळात त्यांना धर्म, कर्म, देव याविषयी काहीच माहिती नव्हती. केवळ देहऐधर्म तो जाणत होता. देहाला आवश्यक अशी भूक, तहान, वासना, इच्छा यांची पूर्तता करून जीवन व्यतीत करीत होता. अशा मानव प्राण्याला विकसित करण्यासाठी परमेश्वराने स्वर्गलोकातून ऋषीजनांना या भूमीवर पाठवून वेदऐविद्या, यज्ञऐयाग, जपऐतप याद्वारे या भूमीला पावित्रय प्राप्त करून दिले. ऋषीमुनींनी भिन्न भिन्न ठिकाणी आपली गुरूकुले स्थापन करून, लोकांना स्थापन करून लोकांना सज्ञान केल. ज्या गुरूकुलात राहून आपण रानटी अवस्थेतुन मुक्त होऊन सज्ञान झालो. आज आथुनिक मानव म्हणून जगत आहोत. ज्या ऋषीकुळात आपला पुनर्जन्म झाला ते आपले कुळ म्हणजे गोत्र होय. ज्या गुरूकुळातुन आपण ज्ञाते झालो त्याचे स्मरण म्हणून प्रत्येकाला आपल्या गोत्राचा उच्चार वेदोक्तऐपुराणोक्त विधीच्या वेळी करावा लागतो. म्हणूनच प्रत्येक समाजबांधवाला आपले गोत्र ठाऊक असलेच पाहिजे. गोत्र ही भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. “धर्मसिंधू” मध्ये गोत्राचे लक्षण पुढीलप्रमाणे दिले आहे.
‘तत्र गोत्रलक्षणम् ऐ विश्वामित्रो जमदग्निर्भद्वाजोsथ गौतम:|
अत्रिर्वसिष्ठ: कश्यप इत्येते सत्पऋषी:|
अत्रिर्वसिष्ठ: कश्यप इत्येते सत्पऋषी:|
विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप हे सप्तर्षी होत. शास्त्रने गोत्रांची विभागणी पन्नास गणात केली आहे. पंचाल, सोनार समाजात प्रचलित एकूण नऊ गोत्रे-
1) भारद्वाज
2) कश्यप
3) जमदग्नी
4) सुपर्ण
5) वसिष्ठ
6) गौतम
7) अपनस्य
8) शांडिल्य
9) देवांगण
2) कश्यप
3) जमदग्नी
4) सुपर्ण
5) वसिष्ठ
6) गौतम
7) अपनस्य
8) शांडिल्य
9) देवांगण
तसेच सानक (सानंग), सनातन, प्रतनस्य आदी अन्य गोत्रेही रूढ आहेत असे आढळून येते. आपल्या समाजात सगोत्री विवाह होत नाही. विवाहाची सोयरिक जमविताना देवक, नातेसंबंध हे ही पाहिले जाते.
देवक
प्रत्येक गोत्रास शास्त्रनुसार उंबर, कदंब, पळस, भारंगी इत्यादि वनस्पतींना देवक म्हणून अग्रमान दिला आहे. मौजिबंधन, विवाह यासारखे मंगल कार्य नीट पार पडावेत. कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंडप देवता विघ्नहर्ता गणेश यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे. यालाच देवक ठेवणे असे म्हणतात. मंगल कार्यात देवक ठेवल्यापासून तू उठेपर्यंत दरम्यान कोणाचेही अशौच नसते. देवक उठल्यावर लगेच अशौच सुरू होते. अशौच (सोहेरऐसुतक) येण्याचा संभव असेल तर लग्नापूर्वी दहा दिवस व मुंजीपूर्वी सहा दिवस देव - प्रतिष्ठा बसविता येत असे शास्त्र सांगते.
विश्वकर्मा कुलोत्पन्न पंचाल सुवर्णकार समाज गोत्रवली सूचिका उपनावावरून
गोत्र
|
देवक
|
उपनाव(आडनाव)
| |||
|
भारंगी
|
सागवेकर, पेढे, रीळकर, वरवडेकर, चाफेकर, लाजुळकर, कोलम्बेकर, कोलसरकर, नरसिंगेकर, बोंडकर, खरवतकर, खोत, चाफेकर, देवळेकर, दाभोळकर, हातखंबकर, माहिमकर, भोपणकर, कळेकर, झाकानेकर, पाचेरकर.
| |||
|
कदंब
|
पंडित, मालगुंडकर, देवुडकर, आडकर, वेलमकर, निवेंडीकर, शेटये ,करंजवकर, कुरदुंडकर, चिखलकर, मालेकर, गोठणकर, गोडेकर
| |||
|
कदंब
|
देवरुखकर, जांभारकर, जांभरूणकर, पुळेकर, केळकर, नेवरेकर, पोचरकर,खेडसकर , भोकेकर, शिरगावकर, गोलपकर, वेतोसकर, फणसाळकर, सातारकर, धावडसकर, बुरंबाडकर, मुरबाडकर, चंद्रोळकर, तोणदेकर.
| |||
|
उंबर
|
मारळकर, नगरकर, नांदेडकर
| |||
|
कदंब
|
तोंदाळकर, मुसाडकर, चाफेकर, काजुर्लेकर, रांजेकर, पालकर, दुधरे, आगवेकर, वाडेकर
| |||
|
कदंब
|
पालकर (राजापूर येथील)
| |||
|
नरवेल/पळस
|
सडकर, बसणकर, कोतवडेकर, इगरूळकर, विगरूळकर
| |||
|
कदंब
|
बोरसुतकर, वारणकर, हिरे
| |||
|
कदंब
|
वाडेकर
| |||
-: इतर प्रचलित गोत्रे :-
| |||||
|
पळस
|
कोसुमकर
| |||
विशेष सूचना :-
पोतदार यांची गोत्रे पुढीलप्रमाणे - भारद्वाज,कश्यप,वसिष्ठ,अपन्स्य,शांडिल्य व सनातन ज्यांना आपले देवक माहिती नाही त्यांनी उंबर देवक म्हणून पूजावे. कदम्ब यांस कलंम्ब असेही म्हणतात. |
Comments
Post a Comment