“विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई"

“विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई"


सन्माननीय सभासद व समाजबंधु भगिनींना विनंम्र आवाहन आपली विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्था स्थापन होऊन 50 वर्षे पुर्ण हून पुढील वाटचाल करीत आहे. नुकताच आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने व सहकार्याने संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात व मुंबई महाराष्ट्रातील अनेक मान्यवराच्या, ज्ञातीबांधवांच्या युवा, महिलांच्या उपस्थितीत पार पाडला आहे. यावेळी सर्वांचेच सहकार्य लाभले आहे. संस्थेच्या पूर्वस्थितीच्या काळात अनेक ज्येष्ठ समाज सेवकांच्या कार्यकर्त्यानी संस्था कार्यरत ठेवण्याचे व समाज संघटीत करण्याचे मोठे कार्य केले आहे. गेल्या 25 ते 30 वर्षाच्या काळात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन ही संस्था नावारुपाला आणली. एक आदर्श संस्था म्हणून आपल्या संस्थेकडे अभिमानाने पाहिले जात आहे. याचे सारे श्रेय संस्थेचे निष्ठावंत कार्यकर्ते व समाजातील सर्व बंधु-भगिनींना आहे. संस्थेचे निस्वार्थी कार्यकर्ते तन, मन, धन अर्पुन सामाजिक सर्वांगीन विकास घडवून आणण्याचा प्रयत्नकरीत आहेत. एकता ही सर्वांत मोठी शक्ती आहे. या एकतेच्या बळावरच व आपणा सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम आतापर्यंत तमाम ज्ञाती बांधवांसाठी राबविले आहेत


ते पुढीलप्रमाणेसमाजातील ज्ञातीबांधवांना कोणताही व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खूप विचार करुन विश्वकर्मा सुवर्णकार सहकारी पतपेढी 1992 साली सुरु केली, पतपेढीतर्फे समाजबांधवाना कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था केली. त्याचा आजपर्यंत अनेक ज्ञातीबांधवांनी लाभ घेतला व घेत आहेत.महाराष्ट्रभर विखूरलेल्या ज्ञातीबांधवांना जागृत करुन एकत्र येण्याची व स्वतचे विचार मांडण्याची संधी मिळाली. समाजात एकसूत्रीपणा यावा म्हणून मुंबई संस्थेने विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाजाची महाराष्ट्रव्यापी प्रथम परिषद नोव्हेंबर 1994 मध्ये भांडूप (मुंबई) येथे घेऊन समाजाच्या इतिहासात अभूतपूर्व नोंद केली. परिषदेत अनेक समाज उपयोगी निर्णय घेण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील अनेक संस्था एकत्र आल्या आणि समाजाच्या एकीची मुहुर्त मेढ रोवली गेली. खेडेगावातील समाजबांधव आपल्या विचारांची देवाण-घेवाण व आपल्या समस्या मांडण्यास वंचित राहू नयेत म्हणून खेड्यातील व शहरातील समाज बांधवांना जवळचे ठिकाण म्हणून चिपळूण येथे महाराष्ट्र व्यापी दुसरी परिषद नोव्हेंबर 1997 मध्ये संपन्न झाली. यावेळीही अनेक ज्ञातीबांधवांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि ग्रामीण भागात समाजबांधव जागृत झाला. समाजातील बंधू-भगिनींच्या सुखदुःखाचे प्रसंग व इतर घडामोडी शब्द रुपाने समाज बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी संस्थेने विश्वकर्मा पंचाल मासिकाची निर्मिती केली. गेली 23 वर्षे सातत्याने मासिक आपल्यापर्यंत पोहचवविण्याचे कार्य संपादक मंडळ करीत आहे. समाजातील तरुण, तरुणी संघटीत होऊन आपल्या नवीन विचारांनी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, समाजासाठी भावी कार्यकर्ते तयार व्हावेत, 

साजसेवेची संधी मिळावी म्हणून युवामंचची स्थापना करण्यात आली. समाजातील महिलाही मागे राहू नयेत, महिला संघटीत होण्यासाठी व त्यानाही समाजसेवेची संधी मिळावी यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली.वैवाहिक समस्या दूर करम्यासाटी बधू-वर सुचक केंद्र सुरु करण्यात आले. वधू-वर मेळावे घेण्यात येतात. तसेच विश्वकर्मा पंचाल मासिकामधून वधू-वरांची सुची प्रसिध्द केली जाते. युवामंचच्या वतीने वधू-वरांसाठी वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांना समाज बांधवांच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजात आलेली मरगळ झटकण्यासाठी व समाजाला पुन्हा जागृत करण्यासाठी जवळ जवळ 12 वर्षांनी तिसरी परिषद भांडूप येथे नोव्हेंबर 2010 साली घेण्यात आली. धार्मिक परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने सामुदायिक मौजीबंधन, श्रावण्या, हळदीकुंकू, समाज सामुहिक विवाह सोहळा तसेच विश्वकर्मा जयंती, नरहरी महाराज पुण्यतिथी,

 ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून समाजभुषण पुरस्कार आदी कार्यक्रम राबविले जात आहेत. समाजाचा शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व्हावा म्हणून शौक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करुन गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येतो. समाजातील विद्यार्थ्यांना व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अपंग विद्यार्थी, आर्थिकदृष्या दुर्बल विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांचा यथाशक्ती आर्थिक मदत केली जाते. यासाठी संस्थेची शिक्षण समिती आपले काम चोखपणे करत आहे. महाराष्ट्रभर परसलेल्या आपल्या समाजाच्या लोकसंख्येचा अंदाज मिळण्यासाठी तसेच महिला, पुरुष, मुले, वृध्द, अपंग त्यांचे शिक्षण, नोकरी, धंदा याची माहिती मिळवून आपल्या समाज कोणत्या परिस्थितीत चालला आहे याचा आढावा घेण्यासाठी सेवासंघाच्या सहकार्याने शिरगणतीचे काम सुरु केले आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये, प्रवेशासाठी तसेच नोकरी धंदा यासाठी आर्थिक दृष्टया मागासवर्गीय प्रमाणपत्र (ओबीसी) सरकारकडून मिळविण्यासाठी संस्थेतर्फे शिफारस देण्यात येते. 

समाजात प्रेम व आपुलकी वाढून सतत शांतता नांदावी. आपापसातील मतभेद, गैरसमज, अन्य होत असेल तर विचार विनिमय करुन कौटुंबिक अथवा समाजिक वाद मिटविण्यासाठी संस्थेतर्फे तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. समाज बंधू-भगिनी त्याचा लाभ घेत आहेत. समाजातील निराधार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दुःखद प्रसंगी मदत केली जाते. नैसर्गिक देशावर संकट आल्यास आपला समाज मागे न राहता यथाशक्ती मदत करुन सरकार दरबारी आपल्या समाजाचे अस्तित्व जागृत ठेवते. आर्थिक दृष्टया दुर्बल ज्ञातीबांधवांच्या कुटुंबातील बटुंचे मौजीबंधन विनामुल्य केले जाते. प्रसंगी काही कुटुंबाना वैद्यकीय मदतही करते. आपली विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई ही संस्था केवळ संस्थाच नव्हे तर महाराष्ट्राती तमाम पंचाल सुवर्णकार समाजाचे एक कुटुंब व स्फुर्तिस्थान आहे. महाराष्ट्रातील विखूरलेल्या समाज बांधवांना जागृत करुन समाज कार्यास प्रवृत्त करुन मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, महाड, पोलादपूर, सातारा सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी समाज बांधवांना त्यावेळी जागृत करुन समाजाच्या संस्था निर्माण केल्या. 

आज सर्व संस्था कार्यरत असून त्या स्वतंत्रपणे कार्य करण्यास अनुमती दिली आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहे. कोकणातील संस्था जिल्हा रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या संस्थांशी सहकार्याची भावना ठेवून एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील समाज बांधवांची एकजूट व्हावी, सर्व समाज एकसुत्री असावा रितीरिवाज एक असावेत म्हणून परिषद घेऊन सर्वांना संघटीत करीत आहोत. यासाठी समाजातील सर्व थरांतून आम्हाला पाठिंबा मिळत असतो. महाराष्ट्रातील संस्था नेहमीच सहकार्यासाठी पुढे येतात म्हणून हे आयोजित केलेले कार्यक्रम यशस्वी होत असतात. महाराष्ट्रभर सद्या समाजिक वातावरण खेळीमेळीचे आहे. निस्वार्थीपणे सर्व कार्यकर्ते समाजाचे काम करत असताना काही बातम्या ऐकून खूप दुःख होते. खेद वाटतो. वरील सर्व इतिहास सांगण्याचे प्रयोजन एवढेच की समाजातील काही कर्मदरिद्री विचारांची माणसे विश्वकर्मा सुवर्णकार समाजाबद्दल समाज बांधवांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करुन समाजामध्ये फूट पाडण्याचा घ्रृणास्पद प्रयत्न करीत आहेत. आपली संस्था कोणतेही समाजिक कार्य करत नाही असे सांगून नाहक बदनामी करत आहे. 

आम्ही यांना सर्व काही देऊ केले होते, परंतु स्वतच्या मोठेपणासाठी व हट्टापायी स्थानिक ज्ञातीबांधवांची दिशाभूल करुन वेगळी संस्था स्थापून ज्ञातीबांधवांना मुख्य प्रवाहापासून तोडत आहेत. विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज या नावाला इतिहास आहे. तरी मुंबई महाराष्ट्रातील सर्व संस्थाना व ज्ञातीबांधवांना नम्र विनंती आहे की जर कोणी अशी समाजद्रोही व्यक्ती येऊन समाजाबद्दल दिशाभूल करुन खोटे गैरसमज करुन पाठिंबा मागत असेल तर त्यांना रोखठोकपणे वरील इतिहास सांगून जाब विचारावा. अखेर वाईट एकाच गोष्टीचे वाटते की आपल्या समाजामध्ये काम केलेले सभासद आपल्या सोबत नेहमीच असणारे काही समाजबांधव हा अपप्रचार करण्याच्या प्रवृत्तींना सोबत करत आहेत. तरी समाजामध्ये फूट पाडून दुही माजविण्याच्या प्रवृत्तीपासून सर्व ज्ञातीबांधवांनी सावधान! 

Comments