रत्न शास्त्र

रत्न शास्त्र 


नवग्रह रत्नाच्या आंगठ्या कोणत्या बोटात घालाव्या?
तसेच इतर रत्नाच्या आंगठ्या बोटात घालाव्या ?
उत्तर : हाताच्या पंजाला पाच बोटे असतात.
१) अंगुष्ट (आंगठा )
२) तर्जनी
३) मध्यमा
४) अनामिका
५) करंगळी आंगठ्यात आंगठी घालत नाहीत.

शनीचे बोट म्हणजे मधले बोट (मध्यमा) शनीला कंकण घालयचे नाही म्हणून या बोटात आंगठी घालत नाही.पण शनीचे नीलम रत्न,केतूचे लसण्या व राहूचे गोमेद रत्नांची आंगठी जाणकारांच्या मार्गदर्शनानेच या मधल्या बोटात घालावी.
१) तर्जनी (गुरुचे बोटात) पुष्कराज रत्नाची आंगठी घालतात.या बोटात माणिक रत्नाची आंगठी घातली तरी चालते. उपरत्ने-पिवळ्या रंगाची सर्व रत्ने,टोपाझ,सिट्रीन,यलो बेरील
2) अनामिका मध्ये (रवीच्या बोटात )माणिक रत्नाची आंगठी धारण केली जातात.तसेच शुक्राचे हिरा हे रत्न,मंगळाचे पोवळे, केतू चे लसण्या,राहुचे गोमेद व हर्षलचे अँलेकझांड्रा हि रत्ने धारण केली जातात. उपरत्ने - हकिक ,सुर्यकांत मणी,स्पिनल,पांढरया रंगाची रत्ने,झरकन, अँमेथीस्ट हि उपरत्ने सुद्धा अनामिकेमध्ये धारण केली जातात.
3) करंगळी (बुधाचे बोटात).बुधाचे पाचू(पन्ना)हे रत्न,चंद्राचे मोती व नेपच्युन ग्रहाचे रत्न -ओपल हि रत्ने धारण केली जातात. उपरत्ने- ऑनेक्स,ऐव्हेनच्युरी,पैरीडॉट,मेल्काइट,चंद्रकातमनी.ग्रिनबेरील,हि उपरत्ने धारण केली जातात.
विशेष सूचना- शनी ग्रहासंबंधित रत्ने कोणत्या बोटात घालावीत हे ज्योतिष शास्त्राचे जाणकार यांनी प्रत्येक जातकाची कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करून कोणते बोट ते सुचवावे गुरुचे तर्जनी हे बोट मुळातच निळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करते ह्या ठिकाणी शनीचे रत्न वापरल्यास चालते.
रत्ने : नीलम, उपरत्ने-निळ्या रंगाचे कृत्रिम नीलम, लजावर्त, लेपिज, लुजली , अमॅथीष्ट

Comments