लक्ष्मणराव कुलथे यांनी समन्वयक म्हणून उत्तम काम केले

लक्ष्मणराव कुलथे यांनी समन्वयक म्हणून उत्तम काम केले

-जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी




नंदुरबार:
शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातुन एक उत्तम समन्वयक म्हणुन लक्ष्मण कुलथे यांनी काम केले असुन त्यांची शासकीय सेवा ही उत्कृष्ट राहीली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले आहे. आज जिल्हा माहिती कार्यालयातील निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कुलथे यांच्या सेवानिवृत्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात जिल्ह्यातील पत्रकारांमार्फतआयोजित करण्यात आला होता.
इंटरनेट नसतांना जिल्हा माहीती कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या शासकीय बातम्या लक्ष्मण कुलथे यांनी उन पाऊस वारा यांची तमा न बाळगता पत्रकारांपर्यत पोहचवल्यात. त्यांनी दिवस रात्रीची परवा न करता पत्रकारांची केलेल्या सेवेने त्यांची पत्रकारांसोबत एक वेगळी नाळ जोडल्या गेली. माणुस हा त्याच्या हुद्याने नव्हे तर त्याच्या स्वभावाने मोठा होतो याचच उत्तम उदाहरण जिल्हा माहीती अधिकारी कार्यालयातील लक्ष्मण कुलथे असल्याचे मत यावेळी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी व्यक्त केल. तर श्री. कुलथे यांनी आता सेवा निवृत्ती नंतर दुसरी इनिंग सुरु केली असुन त्यास पत्रकारांकडुन दिपक कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी पत्रकार रणजित राजपुत, अविनाश सोनवणे यांनी श्री. कुलथे यांच्या अनेक जुन्या नव्या आठवणींनी उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणातुन बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी लक्ष्मण कुलथे हे पत्रकार आणि शासन यांच्यातील दुवा असलेल्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील एक उत्कृष्ट कर्मचारी असल्याचे सांगत त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यमय आणि भरभराटीचे जावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. यानंतर रमाकांत पाटील, दिपक कुलकर्णी, रणजीत राजपुत, जीवन पाटील, राकेश कलाल, हिरालाल चौधरी, निलेश पवार, अविनाश सोनवणे, भिकेश पाटील, महेश पाटील, जगदिश ठाकुर, अतुल चौधरी,वैभव करवंदकर, नितीन पाटील, सुर्यकांत खैरनार, , सुनिल कुलकर्णी , दिनेश चौरे यांच्या उपस्थितीत लक्ष्मण कुलथे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या सत्काराने भारावलेल्या लक्ष्मण कुलथे यांनी पत्रकारांनी व्यक्त केलेल्या प्रेमापोटी आपल्याकडे शब्द नसल्याचे सांगीतले. पत्रकारांच्या प्रेमाची ही शिदोरी आगामी आयुष्याच्या वाटचालीस प्रेरणादीय ठरेल असे मतही यावेळी सत्कारमुर्ती लक्ष्मण कुलथे यांनी व्यक्त केले.
३४ वर्षाहुन अधिक काळ सेवा केलेल्या लक्ष्मण कुलथे यांनी मुंबई, तळोदा आणि नंदुरबार अशा विविध शहरात काम केले आहे. त्यांच्या या सेवानिवृत्ती सत्कार समारंभासाठी योगेंद्र दोरकर, मनोज शेलार, विशाल माळी, रविंद्र चव्हाण, जयप्रकाश डिगराळे, योगेंद्र जोशी, बाबा राजपुत आदिसह पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments