कुलधर्म आचरण
गुरुकुलात राहून सज्ञान झालेल्या मानवास जीवन कृतार्थ करण्यासाठी ऋषीजनांनी ब्रम्हा, विष्णू , महेश या त्रिगुणात्मक शक्तीला देवदेवता व उपास्य देवता म्हणून इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली. तेव्हा इहलोकात मानवाला विद्या, संपत्ती व संतती यांचे सुख, समाधान घराण्यात व कुटुंबात चिरकाल वास करीत राहावी व ते प्राप्त करण्याचे सामर्थ्य मानवाला प्राप्त व्हावे म्हणून कुलदेवता (कुलस्वामी-कुलस्वामिनी) यांचे यथाविधी पूजन,उपासना करण्याची सुरवात झाली . आजपर्यंत समाजात अनेक कुटुंबीय आपल्या घराण्यातील कुलदेवतांचे कुळधर्म-कुलाचार पिढ्यानिपिढ्या करीत आल्या आहे
कुलाची रक्षक देवता म्हणजेच कुलदेवता. सध्या वडिलोपार्जित कुलदेवतेचे पूजन प्रत्येक कुटुंबात चालत आले आहे. आपल्या समाजात ९०% कुटुंबाची कुलदेवता भैरी-भवानी किंवा भैरी-भगवती आहे. आपल्याकडे कुलदेवतेची जी उपासना आहे ती प्रकृती आणि पुरुषाची/शिव आणि शक्तीची आहे. त्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही.ज्या घराण्याची कुलस्वामिनी नाशिक -वणी येथील सप्तशृंगी (महासरस्वती-भगवती) असून त्या पिठाचा कुलस्वामी श्री कालभैरव आहे. शिव आणि शक्ती पूजनाने प्रजावृद्धी होते,भरभराट होते.
कुदेवता पूजन
आपापल्या घराण्यापरत्वे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेची ओळख झाल्यावर भक्तीभावनेने कुलधर्म-कुळाचार करण्यासाठी त्यांची योग्य प्रतिके म्हणजे टाक किंवा मूर्ती जाणकारांकडून तयार करून घ्याव्यात.मूर्ती भरीव असावी.मूर्ती सोने,चांदी,पितळ या धातूची असावी.काही कुलदेवतेच्या मानाने असोल नारळ शेंडी आपल्याकडे करून देव्हारयात ठेवतात.त्यावर हिरवा काठवाला खण घडी करून ठेवावा.तर काही तांब्याच्या धातूपासून बनवलेल्या तांब्यावर सोललेला नारळ ठेवून कुलदेवता म्हणून पूजतात.
देव्हारयात कुलदेवतेची स्थापना गुरुजनांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावी. पंचामृत अभिषेक करताना श्री सुक्त अभिषेक करण्यास सांगावे. नैवैद्य समर्पनानंतर देवीची ओटी भरावी.(ताटात श्रीफळ, काठ असलेला खण घडी करून ठेवावा. तीन ओंजळी गहू किंवा तांदूळ ठेवावेत. हळद, कुंकू, साखर यांच्या तीन पुड्या ठेवाव्यात. दोन विड्याची पाने, सुपारी व सव्वा रुपाया दक्षिणा ठेवावी.) श्रीफळावर हळद, पिंजर अक्षता वाहणे. दुसरे एक श्रीफळ हातात ओंजळीत धरून देवतेसमोर धरून भक्तिभावनेने कुलस्वामीची प्रार्थना करावी.मी यथामती, यथाशक्ती, यथाज्ञानाने तुझी सेवा केली आहे.त्यात काही चूक असेल तर क्षमा असावी! मी केलेली सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी. तसेच मला निरंतर कृपाशिर्वाद देवून जन्मोजन्मी तुझी सेवा करण्याचे भाग्य मला दे! असे म्हणून नारळ वाढवावा(फोडावा) व नारळाच्या शेंडीकडील कवडीतील पाच फोडी कुलस्वामिच्यासमोर ठेवावा. बाकी नारळ प्रसाद करून खावा किंवा शाकाहारी जेवणात वापरावा. नंतर ही ओटी सायंकाळ होण्यापूर्वी देवीच्या देवळात पोचवून मगच अन्न ग्रहण करावे. अशा रीतीने देव्हाऱ्यात कुलदेवतेची स्थापना झाल्यावर दररोज सकाळी स्नानसंध्या करून सर्व देवांची पूजा करताना कुलदेवतेचेही पूजन करावे व प्रार्थना करावी.
विशेष सूचना:
सुतक-सोहेर असल्यास देवपूजा करू नये विटाळाचा संपर्क देव्हारयाला होऊ नये, घराची सुचीर्भूतता (शुद्धता) राखण्यासाठी सोहेर सुतक विटाळ वगैरेसाठी घरात गोमुत्र शिंपडावे, धुपारत,कर्पूर ज्योत यांनीही घराची शुचिता टिकून राहते.
कुलाचार
कुलाचार हे प्रामुख्याने कुल परंपरेने चालत आलेले तसेच कुटुंब संस्थेवर आधारित असतात. कुल म्हणजे गोत्र, कुळ म्हणजे घराणे. आपल्या घराण्यात जे कुळधर्म जसे पूर्वापार चालत आले आहेत. तसेच ते करावेत.
दैनंदिन कुलाचार
दैनंदिन देवपूजा हाही एक कुलाचारच आहे स्नान संध्या, पूजा,नैवैद्य, वैश्वदेव.काकबळी वगैरे दैनंदिन कुलाचार आहेत. कुलाचार म्हणजे एक प्रकारची उपासना,पूजा, धर्मकृत्य आहे. प्रतिवार्षिक व्रत उत्सव ,सण साजरे करताना ते पारंपारिक कुळाचाराप्रमाणे साजरे करावे लागतात. हिंदू संस्कुतीत व्रतांचे अनन्यसाधारण महत्व आहे. व्रताचारामुळे मानवी जीवन उजळून निघते.प्रत्येक व्रतामागील मुळ भूमिका ,उद्देश व्रताचाराचा नेमका विधी या गोष्टींची तपशीलवार माहिती करून घेतल्यास मानवी जीवन सामाजिक, भौतिक व आध्यात्मिकदृष्ट्या अधिकाधिक उन्नत होईल.
प्राचिन काळी तपश्चर्येला जेवढे महत्व होते , तितकेच महत्व आधुनिक काळात व्रताचारास आहे. तपश्चर्या म्हणजे वनात तपसाधना करण्याची आवश्यकता नाही.जीवनात परमार्थासाठी, ब्रम्हानंद प्राप्तीसाठी दया-क्षमा-शांती,सत्य,अहिंसा,परोपकार अशी अनेक शाश्वत मुल्ये आहेत. या शाश्वत मूल्यांचे जतन करणे, समाजात ती रुजविणे यासाठी अखंडपणे, एकाग्रतेने प्रयत्न व चिंतन करीत राहणे म्हणजेच तपश्चर्या. तपश्चर्येमुळे ध्येय साध्य होते. संसारात परमानंद प्राप्ती होते.
तुळस पूजन
तुळस ही लक्ष्मीस्वरूप आहे. स्त्रिया तुळशीला सौभाग्यदायिनी महापतिव्रता असे मानतात. जालंधर पत्नी, महानपतीव्रता वृन्देपासून निर्माण झालेली तुळस हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृन्दे प्रमाणे आहे असे मानून श्री विष्णूस ती फार प्रिय झाली.पुढे वृंदा ही रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास तिने कार्तिक शु.द्वादशीस वरिले म्हणून कार्तिक शु.द्वादशीला तुलसी विवाह करतात, घराच्या लक्ष्मीने लक्ष्मीचे रोज पूजन करणे योग्य आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी यासाठी तुळशिपूजन करण्याचा धर्मात अंतर्भाव केला, त्यामुळे घरासमोर तुळशीवृंदावन असावे असा संकेत ठरला चातुर्मासात आपण विवाह करत नाही, तुळशी विवाहापासून शुभमुहूर्तावर विवाह कार्ये होत असतात.
दैनंदिन देवपूजा
पूजा सुरु करण्यापूर्वी प्रथम भाळी गंध किंवा कुंकवाचे बोट लावावे,मग पूजा विधीला सुरवात करावी अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने ) देवांना चंदन, अष्टगंध लावावे. गंध म्हणजे सुगंध ! कुंकुमिश्रीत अखंड तांदूळ म्हणजे अक्षता. अक्षता या सर्व पूजा उपचारांच्या प्रतिनिधी आहेत. देवांना सुवासिक फुले अर्पण करावीत. त्यातही सुगंध आहे सुवासिक अगरबत्ती,धूप,कापूरयातही सुगंध आहे, या सर्व सुगंधाच्या संयोगाने सर्व वातावरण सुगंधमय, चैतन्यमय होते. देव म्हणजे एक महान शक्ती-चैतन्य ! ही शक्ती सुगंधी द्रव्यामुळे प्रसन्न होते त्या शक्तीत चैतन्य निर्माण होते परमेश्वराचे चैतन्य रुपी आवरण घरात घरासभोवती वास करून राहते. त्यामुळे दुष्ट किंवा पिशाच्य शक्ती तेथून पलायन करतात. देवपूजा करण्याच्या आरंभी कलश, शंख, घंटा, समई, निरांजन, यांची पूजा करतात हाही कुलाचारच आहे.
समई
देव्हाेयाजवळ देवघरात प्रज्वलित असलेली समई देवस्वरूप आहे. सम म्हणजे सारखी ई म्हणजे आई ! आई सारखी असणारी ती समई. देवाला आपण आई म्हणतो. विठाई माऊली असे संत तुकारामांनी म्हटले आहे. एवढे मातेचे मातेचे महत्त्व आहे. कन्येला विवाहात रूखवतामध्ये तिची आई प्रमुख्याने समई देते.ती आई ! थोर तुझे उपकार या भावने ने समईची पूजा करते.
निरंजन म्हणजे पंचमहाभूत तत्त्वांनी युक्त असा स्थूल देह !
निरंजनातील साजूक तूप म्हणजे देह !
कापसाची वात म्हणजे कारण देह !
ही वात पेटविल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो.निरंजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते. तसे आपल्या हातून परोपकार घडावेत, असा बोध यातुन सुचित केला आहे.
रांगोळी
घराबाहेर उंबरठयावर देवघरात,तुळशी वृंदावन येथे रांगोळी काढतात. लहान मोठा सण असो किंवा धार्मिक विधी असो ! भोजनाची पंगत असो अथवा कोणत्याही प्रकारचे औक्षण असो. रांगोळी घातल्याशिवाय पाट ठेवत नाही. रांगोळीमुळे मन प्रसन्न होते.वास्तूमध्ये प्रसन्नता, आरोग्य व लक्ष्मी वास करते. घरात प्रवेशद्वाराला उंबरठा असतो. घरात प्रवेश करणे दुष्ट शक्ती,िपशाच्च शक्ती यांना घरात प्रवेश न होऊ देण्यासाठी उंबरठा ही लक्ष्मण रेषा आहे.घरातील सुवासिनीने स्नानानंतर देवापुढील जागा पुसून रांगोळीने स्वस्तिक काढावे. त्यात हळद पिंजरही घालावी. त्यानंतर प्रवेशद्वार ओल्या फडक्याने पुसावे. दाराच्या उंबरठयांच्या उजव्या ऐ डाव्या बाजूस दोन हळद कुंकवाची स्वस्तिके काढावी. आपण राहतो त्या घरात रिद्धीऐसिद्धिचा सदैव वास असावा. विद्या, संपत्तीने घरात सुखऐसमृद्धि नांदावी असा आहे. रंगावलीने सुशोभित केलेला उंबरठा ओलांडून अवदसा घरात येऊ शकत नाही. स्वस्तिक हे शांती, समृद्विचे प्रतिक आहे. स्वस्तिक म्हणजे मांगल्याचे प्रतिक. दुष्ट शक्तीचा प्रवेश घरात होऊ शकत नाही.
स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, लक्ष्मीची पाऊल व गाईचे पावले या प्रतिमांना शुभ चिन्हे समजतात. धार्मिकद्रुष्टया महत्त्वांच्या अशा या प्रतिमांना देवघरात स्थान असते. भाद्रपदात गौरीचे आगमनापूर्वी घरात लक्ष्मीची पाऊले रांगोळीने काढतात. रांगोळी हळद, पिंजर, गुलाल यांचाही वापर अधिक सुशोभित व मांगल्य म्हणून केला जातो. शेणाने सारवलेले अंगण रांगोळीशिवाय अशुभ मानतात. त्याचे कारण शव अंत्यसंस्कारासाठी नेल्यावर तेथे सारवण घातले जाते. त्यावर रांगोळी काढत नाहीत.
नैवेध
नैवेद्याचे ताट वाढल्यावर शेवटी तूप घालावे. देवासमोर जमिनीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे ताट देवाकडे करून ठेवावे. नैवेद्यम, समर्पपयामि असे म्हणत ताटाभोवती पाणी फिरवावे व प्रेमाने घास भरवित आहोत अशी हस्तमुद्रा करत ॐ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रम्हणे स्वाहा असे म्हणावे. अन्न हे जीवन, अन्न हाच प्राण समजून डावा हात छातीवर ठेवावा. डोळे बंद ठेवावेत असे तीन वेळा करावे. देवाला नैवेद्य समर्पण केल्यावर ते अन्नाचे ताट असेल तर यजमानाने किंवा त्याच्या घरातील मंडळीनेच भोजनासाठी घ्यावे. देवाला समर्पण केल्यावर पदार्थांमध्ये त्याची कृपाद्रुष्टी प्रसाद भक्षण करण्यावर व्हावी हा प्रसाद ग्रहणामागील हेतु आहे.
आरती
देवाला ओवाळली जाणारी निरांजने तुपाची असतात. तसेच एका ज्योतीस दोन वाती असाव्यात. तुपाच्या वातींना फुलवाती म्हणतात. प्रज्वलित निरांजनाने देवाला ओवाळणे त्याला आरती करणे म्हणतात व माणसाला ओवाळतात त्याला औक्षण असे म्हणतात. कापूर पेटवून करतात ती कर्पूरारती.
पंचारती
पंचारतीमध्ये पाच ज्योती असतात. प्रत्येक ज्योत ही प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान या पंच प्राणांचे प्रतीक आहे. पंचारती मध्ये देवाला पंचप्राण ओवाळून आरती करीत आहे अशी भक्तिमय भावना त्यात आहे. आरती म्हणावयाची असते. आरती म्हणजे अत्यंत आर्त स्वरात लहान बालक लडीवाळपणे आईजवळ मागते तसे भगवंत हीच आपली माता आहे. या भावनेने लीन होऊऩ प्रेमभावनेने सुरील आवाजात टाळऐमृदुंगाच्या तालात आरती म्हणावयाची असते.
“संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना जयदेव, जयदेव” असे समर्थांनी म्हटले आहे. आरती झाल्यावर सर्वजण ज्योतीवरून हात फिरवित डोळयांना व हृदयाला लावतात. कारण आरतीमधील दिपज्योती म्हणजे अग्नी प्रात्यक्ष देवतास्वरूप निर्गुण रूपातील परमेवराची भेट आपल्या करकमळांनी आरती घेताना करून देत असतो। आरती घेताना आरतीवरून धन (दक्षिणा) ओवाळून ताम्हाणात टाकतात।
प्रदक्षिणा
देवाला उजव्या बाजूला राखून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते। जेथे जागा नसेल तेथे स्वतभोवती फिरून प्रदक्षिणा घालतात.
सोमसूत्री प्रदक्षिणा:
शिवाच्या मस्तकावरून खाली गंगा उतरत असते। शिवलिंगावर गळतीतून सतत पाणी पडत असे। ते ओलांडायचे नसते म्हणून शिवाच्या नालीपर्यंत अर्धी प्रदक्षिणा घालून परत उलट त्या नालीपर्यंत येतात अशा रितीने शिवलिंगाभोवती सोमसुत्री प्रदक्षिणा करावी। देवाला उजवे ठेवून हात जोडून प्रदक्षिणा घालतानाआपले मुख, आपण जोडलेले हात या आठही दिशाकडे होत असताना या आठ दिशाच्या प्रत्येकी एक स्वामी आहे।प्रदक्षिणेमुळे अष्टदिक्पालांनाही अनायसे नमस्कार होतो।
दक्षिणा
कोणतेही धार्मिक कार्य केल्यानंतर गुरूजींना त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक द्रव्य द्यावयाचे असते। त्याला मानधन म्हणतात किंवा दक्षिणा म्हणतात। दान म्हणत नाहीत। दक्षिणा दिल्याशिवाय आपण केलेल्या धार्मिक कार्याची फल प्राप्ती होत नसते।
धन हे विष्णूपत्नी लक्ष्मीचे प्रतिक आहे। सोने, नाणे रूपे, धान्ये ही सुद्धा लक्ष्मीचीच प्रतीके आहेत। दक्षिणा देताना त्यावर उजव्या हाताच्या चारही बोटावरून संकल्प म्हणून उदक सोडून देण्यात येते। एकदा उदक सोडले की परत त्या धनाची अभिलाषा करता येत नाही। संतुष्ट मनाने दक्षिणा अर्पण केल्यावर ईष्ट फलप्राप्ती होते।
शिधा
(आमान्न) एका किंवा इच्छेनुरूप अधिक व्यक्तींना पुरेसे भोजन करण्याइतपत दिले जाणारे तांदुळ, डाळ, गव्हाचे पीठ, भाजी, गुळ इत्यादि कोरडे पदार्थ भटजींना धार्मिक कार्य आटोपल्यावर सुपातुन द्यावयाचे असतात। त्याला शिदा म्हणतात।
तोरण
शुभ कार्य, मंगलकार्य सुचक असे हे तोरण प्रवेशद्वाराला बांधतात। केळीचे तोरण विवाह प्रसंगी बांधले जाते। आंब्याचे डहाळे दारावर लावतात। झेंडूची फूले, भाताची लोंब व आंब्याची पाने यांचे तोरण परिचीत आहे। विशेषत दसराऐदिवाळीला, लक्ष्मीपूजन, प्रतिपदा या वेळेस घरांना व दुकानांना आम्रपल्लव, झेंडु आणि नवीन धान्य भाताची लोंब याने सजवतात। आम्रपल्लवाच्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचा वास असतो। म्हणून कलशामध्ये आम्रपल्लव घालुन त्यावर नारळ ठेवतात। भाताची लोंब धान्य समृद्धीचे प्रतिक आहे। महिला कुशल हस्तकलेने अनेक सुंदर व आकर्षक तोरणे बनवितात। यात गणपती, स्वस्तिक, कलश, पाने, फूले, अशा मांगल्य सुचक प्रतिमांची उत्तम सजावट केलेली आढळते।दारावर गणपतीचे अस्तित्व असले म्हणजे तेथे विघ्न प्रवेश करू शकत नाही।
केळवण
आपल्या समाजात अजूनही बटू, वर-वधू यांना आमंत्रित करून मेजवानीचे जेवण, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देण्याचा रिवाज आहे। त्यालाच ‘केळवण’ म्हणतात। ज्याचे मंगलकार्य ठरले आहे। त्याला आमंत्रित करून तोंड गोड करणे व शुभेच्छा देणे हा त्या मागील उद्देश आहे।
ओटी भरणे
1) विवाहानंतर प्रथमच घरी आलेल्या स्त्रघ्ची ओटी भरतात।
2) सौभाग्यवती स्त्रिाांची शुभकार्य प्रसंगी खणानारळाने ओटी भरतात।
3) माहेर ाहून सासरी जाताना मुलीची ओटी भरतात।
ओटीसाठी खण, साडी, नारळ, सुपारी तांदुळ किंवा गहू, हळकुंड, फळे, खोबेयाची वाटी वगैरे प्रसंगानुरूप ओटी भरण्याची प्रथा आहे। एक सुवासिनी दुसेया सुवासिनीला प्रथम हळद कुंकू लावून मग तिच्या साडीच्या पदरात नारळ, सुपारी, तांदुळ, हळकुंड यांनी ओटी भरतात। स्त्रिाांचा पोटाखालचा भाग म्हणजे ओटीपोट तेथ्दाच गर्भाशय आहे। म्हणून गर्भाधान विधीला ओटी भरणे म्हणतात। गरोदर सुवासिनीची पहिल्या गर्भारपणात सातव्या महिन्यात घरगुती समारंभ करून फक्त दोन ओटी भरतात। एक सासरची व एक माहेरची। गर्भिणीला व गर्भाला सुख वाटावे म्हणून ही ओटी भरतात। नारळ हे पुरूष तत्वाचे प्रतिक आहे। हळकुंडाची वाढ जमिनीत (पृथ्वीच्या पोटात) होते गर्भाशयात वाढणोया गर्भाचे ते प्रतिक आहे।मुलीचे लग्न ठरले की साखरपुडयाचे वेळी तिची प्रथम ओटी भरली जाते। ओटी भरण्याचा सुखद अनुभव तिला येतो। त्यावेळी पाच प्रकारच्या फळांनी पाच सुवासिनी मुलीची ओटी भरतात। ओटी भरण्याचे महत्त्व लक्षात घेता साखरपुडा होऊन लग्न मोडणे हे समाज विघातक कृत्य आहे। मुलगी माहेरहून सासरी जाऊ लागली की तिला हळद कुंकू लावून ओटी भरण्याची प्रथा (कुळाचार) आपल्या समाजात आहे।
सुवासिनीने आपल्या कुलस्वामिनीच्या किमान पाच ओटया दरवर्षी भराव्यात.
1. चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा)।
2. वण शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवार
3. अविन शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवार
4. दिवाळी प्रतिपदा (कार्तिक शु।1)
5. पौष शुद्धपक्षात मंगळवार किंवा शुक्रवार
याच महिन्यात संक्राती निमित्त हळदी कुंकू समारंभाचे महत्त्व असते। आलेल्या सुवासिनीनी सौभाग्यवान म्हणून हळद कुंकू यांच्या दोन पुडया व साखरेची पुडी भेट द्यायची असते.
पानाचा विडा
नागवेलीची देठासह दोन पाने व त्यावर अखंड सुपारी ठेवली की झाला पानाचा विडा तयार! पानाचा विडा देवापासून ठेवून मंगल कार्याचा गणेशा सुरु होतो, नंतर पानाचा विडा तुळशीपुढे ठेवतात. त्यानंतर पानाचा विडा देऊन वडील माणसांना नमस्कार करून शुभकार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतात असा आपला कुळाचार आहे.
नागवेलीची पाने
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. सुपारी हि समृद्धी मांगल्य व प्रेमभाव यांचे प्रतीक मानले जाते.म्हणून अखंड सुपारी श्रीगणेश समजून शुभकार्यारंभी तिचे पूजन करतात. पती-पत्नी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा! सौभाग्य,पवित्रता,प्रेमभाव यांचे अतूट नाते सांगणारा ! पत्नी निधन झाली असता मंगल कार्याच्या वेळी विधुर आपल्या उजव्या कनवटीला सुपारी लाऊन ते कार्य पार पाडतो. पूजेच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूला बसून पतीच्या हाताला हात लाऊन मंगल कार्य पार पाडते.अशा रीतीने सुअरीला पत्नीचे स्थान प्राप्त झाले आहे. मांगल्य व स्नेहभाव वृद्धीसाठी पण सुपारी समारंभ साजरे करीत असतात.साखरपुडा समारंभाच्या वेळी उपस्थित मंडळीना पानाचा विडा देतात त्याला साक्षीविडा असे म्हणतात.नागवेलीची पाने, चुना, कात, सुपारी, वेलदोडा, जावंत्री, खोबरे,बडीशेप असा पानाचा विडा शरीरातील तेरा दोष नष्ट करणारा असतो त्याला त्रयोदशी विडा म्हणतात.
उलपे काढणे
विवाहाचे पूर्व दिवशी वधु-वर यांचे घरी कुलाचाराप्रमाणे देवदेवतांचे मन काढले जातात.त्याला उलपा काढणे असे म्हणतात.(उलपा म्हणजे पत्रावळीवर एकन नारळ,मुठभर तांदूळ, पानाचा विडा दक्षिणा ठेऊन नारळावर व विडयावर सलाड,पिंजर,अक्षता व फुल वाहणे) अशारितीने कुळदेवता, ग्रामदेवता, ईश्त्देव्तांचे उलपे काढतात. असे दहा ते बारा उलपे देवघरात, देवा जवळील जागेत मांडतात. नंतर यजमान यजमानीण, वधू-वर हातात अक्षता घेऊन कुलदेवतेपासून सुरवात करून त्या त्या देवतांना आवाहन करतात. शुभकार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शुभाशिर्वाद मागतात व अक्षता त्या उलप्यावर वाहतात विवाह कार्य पार पाडल्यानंतर त्या त्या देवतांच्या नावाने तो प्रत्येक उलपा मानवावयाचा असतो.ग्रामदेवतेचे उलपे त्या देवळात जाऊन तो मान द्यायचा असतो.
Comments
Post a Comment