सुर्वणपुष्प संस्था,पुणे

💐 सुर्वणपुष्प संस्था,पुणे💐

 आयोजित
   🌹 *राज्यस्तरीय मोफत वधुवर मेळावा* 🌹

*पांचाळ सोनार समाज* 
*दिव्यांग अपंग*.
*घटस्फोटित*.
*विधवा,विधुर तसेच*
*जास्त वय असलेले विवाहेच्छूक*.


🏵 *रविवारी दि.10 जुन 2018 रोजी*  🏵
*सकाळी 8:00 ते सांयकाळी 6:00 पर्यंत*

*स्थळःखंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन,आकुर्डी चौक आकुर्डी पुणे*.

*जीवनाच्या जोडीदाराची पुनर्विवाहातून भेट!*

पुनर्विवाह हा योग्य पर्याय ठरू शकतो, या जाणिवेतून सुर्वणपुष्प संस्था मेळाव्याचा माध्यमातुन कार्य करत आहे.
तरुणपणातच अचानक येणारा दुर्दैवी मृत्यू आणि सूर न जुळल्यामुळे होणारे घटस्फोट अशा कारणांमुळे अनेक कुटुंबं विस्कळीत होत आहेत. अर्ध्यावरती डाव मोडल्यानंतर उर्वरित आयुष्य एकाकी व्यतीत करण्यापेक्षाही पुनर्विवाह हा योग्य पर्याय ठरू शकतो, या जाणिवेतून सुर्वणपुष्प संस्था कार्यकरत आहे. अशा विवाहातून अनेकांची जीवनाच्या जोडीदाराचे संसार नव्याने फुलतील.

जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती न झाल्यामुळे घटस्फोट होत आहेत. त्यामुळे समाजामध्ये घटस्फोटितांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अपघातामध्ये अचानक आलेले मरण आणि अवचितपणे येणारा नैसर्गिक मृत्यू यामुळे लहान वयामध्येच मुलगी विधवा होते. तर, काहीवेळा पुरुषदेखील विधुर होतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे व्यथित असलेल्या व्यक्तींच्या दु:खावर अलगदपणे फुंकर घातली जावी, त्यांच्या आयुष्यामध्ये सहजीवन परत एकदा फुलून यावे आणि त्यांच्या अस्थिर जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त व्हावे या उद्देशातून सुर्वणपुष्प संस्था कार्यकरत आहे. गेल्या दहा वर्षांत किमान शंभरहून अधिक घटस्फोटित, विधवा आणि विधुर यांना पुन्हा एकदा विवाहबंधनामध्ये अडकून सुखाने जीवन व्यतीत करावे हिच अपेक्षा आहे.
 सुर्वणपुष्प संस्था पुनर्विवाहईच्छुकांचा,वयस्करबांधवाचा मेळावा घेत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून  अधिक विवाह जुळले जावे त्यांचे सहजीवन आनंदामध्ये सुरू राहावे हिच अपेक्षा आहे... 
समस्त पांचाळ सोनार समाज बांधव  दिव्यांग अपंग ,घटस्फोटीत,विधवा,विधुर,आणि जास्त वय असलेले,यांना आव्हान करतो कि  आपण या मेळाव्यात सहभाग नोंदवावातसेच आपल्या जवळपास किंवा आपल्या माहितीतील इतर समाजबांधव यांच्या पर्यंतया भव्य मेळाव्याची माहिती आपापल्या लोकांपर्यत पोहोचवावी    
हि नम्र विनंती.
आपला 
योगेश ना.आचार्य पंडित 
अध्यक्ष 
सुवर्णपुष्प संस्था पुणे 
महाराष्ट्र राज्य

Comments