संत नरहरी सोनार
ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले
देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।
Comments
Post a Comment